Close

Copy & paste

उद्योगपती असेच होता येत नाही

माणुस पण असाच मोठा होत नसतो. 10 रु. नोकरी ते 10 हजार कोटीं ची उलाढाल.
फिनोलेक्स चे संस्थापक प्रल्हाद परशराम छाब्रिया ऊर्फ PP यांचा थक्क करुण देणारा हा प्रवास. 35 वर्षा पूर्वी कोणाला स्वप्नात पण वाटल नसेल की हा मुलगा 1 दिवस उद्योग क्षेत्रा मधे आपले वर्चस्व निर्माण करुण फाइबर इंडस्ट्री वर राज्य करेल पण हे शक्य झाल मेहनत चिकाटी आणी प्रयत्नवादा मुळे
PP हे मुळ चे पाकिस्तान च्या सिंध प्रांतात ले त्यांचे वडिल परशराम छाब्रिया हे तिथील प्रसिद्ध कापड व्यापारी पण 1942 साली वडिलांच आकस्मित निधन झाल आई 5 बहिणी व 5 भाऊ अस हे कुटुंब उघड्या वर आल. त्या वेळी प्रल्हाद छाब्रिया एका दूरच्या नातेवाईकाचा धागा पकडून पुण्यात आले. त्यावेळी त्यांच वय होत अवघ 12 वर्ष व शिक्षण 2री झालेल शिक्षाण नसल्य मुळे कोणी नोकरी देत नव्हत. शेवटी एका ठिकाणी त्याना सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली 16 ते 18 तास काम करू लागले दर महिना ते आपल्या आईला 30 रु पाठवत होते त्यातच1945 साली फाळणी च्या झळा बसु लागल्या तय मुळे सर्व छाब्रिया कुटुंब पुण्या मधे आले. नारायण पेठेत 2 रूम मिळाल्या. त्यानंतर छाब्रिया बंधुनी मुंबई हुन कापड आणुन कापड विक्रिचा व्यवसाय चालु केला त्या मधे पण कसे तरी 5रू मिळायचे. त्या नंतर इलेक्ट्रोनिक्स च्या वस्तु विकु लागले सरकारी निविदा भरणे चालूच होत. परिस्थिति पण खुप बिकटच होती कधी जेवन मिळत होत तर कधी पाणी पिउन भुक मिटवावी लागत होती.

प्रयत्न मात्र चालुच होते. त्यातच देहु कँटोमेंट बोर्डा ची बेडिंग वायर ची निविदा निघाली आणी तोच छाब्रियां साठी टर्निंग पॉइंट ठरला हे काम छाब्रियां ना मिळाल व 10 बाय 10 च्या खोलीतून फिनोलेक्स चा प्रवास सुरु झाला तो आज पर्यन्त कधी थांबला च नाही एका छोट्याश्या खोलीतुन सुरु झालेली ह्या कंपनीचे आज सगळ्या भारतभर जाळे पसरले आहे. पुणे, रत्नागिरी , शिरवळ, गोवा, उत्तराखंड अश्या 5 कंपनी व 11 कारखाने असा हा फिनोलेक्सचा पसारा वाढला आहे. २ री नंतर शाळेत ही न जाऊ शकणारे छाब्रिया हे उद्योगपति झाले फ़क्त आणी फ़क्त कष्ट आणी प्रत्नांवरती. हार कधी या माणसाने मानलीच नाही असंख्य संकटे आली पण कधी मागे सरकला नाही तेही पाठिशी कोणीसुद्धा नसताना.आजच्या काळा मधे आमचा इंजीनियर इतक्या लवकर हारला की तो आज स्वताची इज्जत स्वताच सोशल मीडया वर काढत आहे . हे दुर्दैवच म्हणावं लागेल. उत्तुंग शिखरावर चढत असतानासुद्धा छाब्रिया कुटुंबाचे पाय हे सदैव जमीनीवरतिच राहिले. सगळा उद्योग व्यवस्थित चालु झाला होता कश्याचिच कमतरता नहव्ती तरीसुद्धा छाब्रीयांच्या 5 ही जनांची मुल सकाळी लवकर कंपनी मधे येउन कचरा काढण्या पासुन ते केबल तयार करण्या पर्यन्तचे काम न लाजता स्वता इतर कामगार लोकांबरोबर करायची. 12 ला कंपनी च्याच कैंटीन मधे जेवण करुण ही पिंपरी मधुन लोकलने पुण्याला वाडिया कॉलेज ला शिक्षणासाठी जायची कॉलेज सुटलं की परत कंपनी मधे कामाला यायची स्वतःचे वडिल उद्योगपती असताना ही मुलं कधीच कामाला लाजली नाहीत म्हणून आज यशापर्यन्त पोहचलेत

*आमच्या आजच्या मुलाना वडिलांनी काम सांगण्या आधीच आई म्हणते तो – ती इंजीनियरिंगला आहे, MBA ला आहे – याला आहे-त्याला आहे – त्याला/तीला हे काम नका सांगू.*

जीवनात कोणतच काम हे कमी नसतं आणि कामापेक्षा कोणी मोठं नसत हे श्री प्रल्हाद छाब्रिया यांनी सिद्ध करुण दाखवल.
अश्या या तडफदार व खंबीर उद्योगपतीला प्रथम पुण्यस्मरणाच्या निम्मितान🙏🙏🙏

शेतकर्यांशी जोडलेल ५० वर्षाच अतुट नात म्हणजेच …………….
” फिनोलेक्स”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *