ई-लर्निंगची गंमत!
ई-लर्निंगची गंमत!गंमत!
ई-लर्निंग ही संकल्पना आताकेवळ कॉलेज विद्यार्थ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही सुविधा आताशाळेच्या विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध होणार आहे. गरीब घरातीलविद्यार्थ्यांनाही ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत यावे यासाठीवडाळ्याच्या गणेश विद्यालय या शाळेत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण हाउपक्रम सुरू करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमातील काही धडे, कविता याई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जातील. ज्याविद्यार्थ्यांना कम्प्युटर आणि तत्सम वस्तू घेणे शक्य नाही, त्यांनाशाळेच्या या उपक्रमाचा खूप उपयोग होईल. अभ्यासातील ज्या संकल्पनाविद्यार्थ्यांना पटकन उमगत नाहीत त्या पीपीटीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनासमजावल्या जातील. यासाठी शाळेतील प्रत्येक शिक्षकाला एक पेन ड्राइव्हदेण्यात येणार आहे. आपल्या वर्गाला आवश्यक असलेला अभ्यासक्रम शिक्षकांनी यापेन ड्राइव्हमध्ये घेऊन आठवड्यातून एकदा या माध्यमातून विद्यार्थ्यांनाशिक्षण दिले जाईल.
‘मुळात रोजच्या त्याच-त्याच वह्या-पुस्तकांनाकंटाळलेल्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिकवले असताअभ्यासाच्या संकल्पना लवकर स्पष्ट होण्यास मदत होईल. तसेच कम्प्युटरचा वापरकसा करावा याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. काही गोष्टीविद्यार्थ्यांना वाचून किंवा लिहून पटकन काळात नाहीत, तेव्हा या माध्यमाचाविद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल,’