आनंददायी शिक्षण

आनंददायी शिक्षण

आनंददायी शिक्षणाचं महत्त्व आहे. केवळ शिक्षणातच नाही. माणसाला प्रत्येककृतीतच आनंद हवा असतो. दिवसभर कामाच्या, कधी नको त्या माणसांच्या रगाडय़ात, कधी रागावलेला- कातावलेला असतो तेव्हा त्याला आनंद हवा असतो. लहान मुलं तरसदैव आनंदात असतात. स्वत:ला रमवत असतात, स्वत:शी हसत असतात, गाणीगुणगुणतात. मोकळेपणाने नाचतात. स्वत:ला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात असतात.कोणी रागावलं, मारलं तर मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. त्या निर्माणहोतच असतात. मात्र त्या दीर्घकाळ रेंगाळू नयेत.अखेर आपला मेंदू म्हणजेअनेक तऱ्हेचं वायिरग आहे. नकारात्मक भावनांशी जास्त वायिरग जुळलं, म्हणजेमेंदूच्या त्या भागात जास्त न्यूरॉन जुळले तर त्याचा परिणाम झाल्याशिवायराहणारच नाही.त्यापेक्षा न्यूरॉन आनंदाशी जुळावेत. आनंद ही सर्वातश्रेष्ठ अशी सकारात्मक भावना आहे. प्रेम, सुरक्षितता, आत्मीयता, आस्था यासगळ्या त्याच्याच छटा. ही भावना सर्वाधिक गरजेची असते. न्यूरॉन्सचं सर्वातजास्त वायिरग इथे हवं. आनंदी मन आणि स्थिर बुद्धी याचं साहचर्य हे असं आहे; जुनं आदिम काळातलं!