Talentsearch Quiz | ज्ञानरचनावादातून प्रज्ञाशोध
जग प्रचंड वेगाने बदलत आहे. रोज नवनवीन ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसीत होत आहे. बदलाचा हा प्रचंड वेग आताच्या पिढीला पकडता आला पाहिजे. पालक मुलांच्या शिक्षणासाठी जागरूक आहेत. आपल्या मुलांच्या हातात शिक्षणासाठी उत्तमातील उत्तम साधनं द्यायला तयार आहेत. फारच अॅडव्हान्स पिढी शिक्षकासमोर आहे. पाठांतर, पोपटपंची, घोका यापेक्षा नवप्रेरित विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित करण्याचा प्रयत्न अॅप मधून करण्यात आला आहे….
एखादी गोष्ट करून बघण्याची, विचार करण्याची, विश्लेषण करण्याची, पडताळा घेण्याची, स्वत:चे मत तयार करण्याची निर्मितीची संधी ज्ञानरचनावाद देतो. हा धागा पकडून लेवलची निर्मिती केली आहे.
१)प्राणी, पक्षी, किटक २) फुले, फळे, वनस्पती, भाज्या ३) वाहने ४) सण व उत्सव ५) पेय ६) वाद्ये ७) धर्मस्थळे ८) नातेसंबंध ९) ऋतू १०) आपले शरीर ११) व्यावसायिक १२) हवा १३) अवकाश १४) रंग १५) आठवडा, महिना, वर्ष १६) चव १७) अन्नपदार्थ काळजी १८) पर्यावरण १९)परिमाणे २०) भौमितीक आकार २१) स्पर्शज्ञान २२) घड्याळ २३) १ ते १० अंक मराठी / इंग्रजी. उपरोक्त सर्व घटकांची माहती वयानुरुप व बुध्दीनुसार दिल्यानंतर पारंपारिक पध्दतीने प्रश्न प्रकाराऐवजी स्पर्धा परीक्षात्मक प्रश्न प्रकारानुसार मुलांना घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास ज्ञान / कौशल्ये प्रवाहित राहण्यास मदत होते. यासाठी बहुपर्यायी उत्तरातून विचारपूर्वक उत्तर शोधून लिहिण्याचे कौशल्य मुलांच्या मध्ये प्राप्त होवू शकते..
प्रज्ञाशोध अॅपची वैशिष्ट्ये (Kids GK Quiz in Marathi )
मुलांचा विचार करून तयार केलेले
गेम पद्धतीने सराव
ज्ञानरचनावादावर आधारित
सामान्यज्ञानाचा सराव
कमी साईझमध्ये
भरपूर प्रश्न संख्या
पहिली दुसरी विद्यार्थ्याना उपयोगी
सर्व समावेशक प्रश्न
Leave a Reply