एक उंदीर एका बैलाच्या पायाला चावला आणि हळूच बिळात लपून बसला. बैल खूप चिडला आणि शिंग वर करून तो कोण चावले ते पाहू लागला.
तेव्हा उंदीर हळूच बिळाच्या तोंडाशी आला व हसून म्हणाला, ‘तू एवढा शक्तिमान पण माझ्यासारख्या क्षूद्र प्राण्याचा सुद्धा तुला प्रतिकार करता येत नाही तर तुझ्या शक्तीचा काय उपयोग ?’
तात्पर्य
– एखादा क्षूद्र प्राणीसुद्धा आपल्याला त्रास देऊ शकतो.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply