दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रिण. कॉलेजपासून दोघेही एकत्र. मग नकळतच मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. आवडत तर होते पण स्वतःहून बोलायला कोणी तयार नाही.. त्याला वाटायचं तिला आपल्या मनातलं समजलं तर ती असलेली मैत्री सुद्धा तोडून टाकेल….आणि तिला वाटायचा की मी स्वतःहून विचारलं तर तो म्हणेल की, आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत…गैरसमज होईल.. दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते, पण बोलायला तयार नाही… एकदा तिने तिच्या मैत्रिणीला सहज कॉल केला. ती हॉस्पिटलमध्ये अॅड्मिट आहे. असं तिला समजलं ती लगेच तिला भेटायला गेली. रूमच्या आत जाताच तिला एक अनोळखी माणूस दिसला. पण तरीही ती गेली तिच्यापाशी व विचारपूस करू लागली…. तेव्हा तिला समजलं की तिच्या मैत्रिणीला कॅन्सर झाला होता. ती काही दिवसचं जगणार होती.. दोघीही रडत होत्या. नंतर मग थोड्या वेळाने तिने तिला त्या माणसाविषयी विचारलं… कोण…? कुठला…? मी कधी याला पाहिलं नाही… ती उदास नजरेने त्याच्याकडे पाहते… आणि बोलते “हा आम्ही लहानपणापासूनचे फ्रेंड्स..”
एकत्र लहानाचे मोठे झालो नंतर घर बदलले जॉब वेगळा सगळं वेगळं झालं. पण मैत्री तशीच होती… आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचो, पण आम्ही कधी भावना व्यक्त केल्याच नाही. दोघेही घाबरायचो. पण नंतर आमच्यातला दुरावा वाढतच गेला. पण एकदा मी ठरवलं की आज त्याला सगळं सांगून टाकायचं. तेव्हा मी त्याच्या घरी गेले. पण तिथे समजलं की त्याचं लग्न ठरल आहे… मग मी स्वतःहुनचं काही सांगितलं नाही… वेळ लागला पण मी स्वत:ला सावरलं.. निदान तो, त्याच्या आयुष्यात सुखी आहे हेच समजून मी जगत होती. आज मी त्याला हे सत्य सांगितलं तर बोलला की तो ही माझ्यावर प्रेम करत होता. पण बोलला नाही आणि आज बोलला तर आयुष्यच उरले नाही माझ्याकडे… असं वाटत की त्या वेळेस जरा हिंमत करून मी त्याला विचारलं असतं.. तर प्रेमाचे काही क्षण तरी नशिबात आले असते… आज प्रेम आहे तर क्षणच अपुरे आहेत आमच्यासाठी…
हे सर्व एकूण ती खूप टेन्शन मध्ये येते… ती लगेच तिच्या त्या मित्राला फोन करते… भेटायला बोलावते…. तो येतो…. ती त्याला घट्ट मिठीत घेते आणि म्हणते… “तुझं माहीत नाही मला…. पण मी खूप प्रेम करते तुझ्यावर” तो सुद्धा मग थोडा हसतो आणि म्हणतो “मी पण”
मित्रांनो आयुष्यात असं काहीच करू नका की पुढे जाऊन तुम्हाला वाटेल “कदाचित हे केलं असतं तर…
असं बोलला असता तर… असं करायला हवं होतं..” कारण जेव्हा तुम्हाला असं वाटेल तेव्हा कदाचित तुमच्या कडे वेळचं नसेल. उद्या कधीच येत नाही नेहमी येतो तो आज…. म्हणून आजच्या दिवसातचं मनसोप्त जगा…
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply