एक नाते असे ही..

विष्णूला काही सुचत नव्हते काय करावे.. कसा बसा तो सीमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता… नवीनचं थाटलेला संसार आता थोडा विखरला होता.. सीमाला अचानक रक्ताच्या उलट्या चालू झाल्या होत्या… विष्णू ने तिला अॅडमीट केले… त्याला ही सुचेना काय करावे.. प्रेमविवाहामुळे विष्णूच्या घरचे ही रुसले होते आणि सीमाच्या घरचे ही.. मदत कुठून मागावी कळत नव्हते.. घरासाठी लोन काढले होते त्यामुळे सॅलेरीचे पैसे ही हफ्ता भरण्यासाठी जात होते.. त्याच्या हातात उरले होते ते फक्त प्रेम आणि विश्वास… काय करावे आपल्या बायकोसाठी.. हॉस्पिटलमध्ये उभा राहून तो तिलाच पाहत होता… ती शांत झोपली होती.. अचानक डॉक्टर बाहेर आले, त्यांनी विष्णूला कॅबिनमध्ये बोलावून घेतलं.. विष्णू गेला.. तेथे एक मुलगी ही बसली होती.. डॉक्टर तिच्याशी सवांद करत होते.. त्या मुलीचा नवरा हॉस्पिटलमध्ये सिरीयस होता… डॉक्टर तिला सांगत होते की तिच्या नवऱ्याकडे आता जास्त वेळ उरला नाही तुम्ही त्याला भेटून घ्या.. नंतर डॉक्टरांनी विष्णूला बोलावून घेतले..
डॉक्टर, “ सीमाच्या पोटात गाठ झाली आहे.. ती लवकरात लवकर काढली नाही तर तिला वाचवणे शक्य नाही..

विष्णू हे ऐकून मनात दुखी होतो.. आणि मानत भरलेला श्वास बाहेर टाकून डॉक्टरांना विचारतो..“ डॉक्टर आता काय होईल ?”
डॉक्टर, “ तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फीज भरा आम्ही ऑपरेशनची तयारी करतो..

विष्णू, “ तिला काही होणार तर नाही ना डॉक्टर..
डॉक्टर, “ आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करू.. तुम्ही लवकरात लवकर फीज भरा तशी आम्हाला ऑपरेशनची तयारी करायला..
विष्णू, “ साधारण किती फीज भरावी लागेल.

डॉक्टर, “ १००००० रुपये भरावे लागतील..
विष्णू ठीक आहे म्हणून कॅबिनच्या बाहेर येतो…
विष्णू बाहेर खुर्चीवर डोक्यावर हात देऊन बसला होता. एवढे पैसे कुठून आणावे हे विचार करत होता.. त्याने मित्रांना फोन करून पैसांची मदत मागीतली होती. पण कोणीही तयार नव्हते. कॅबिनमध्ये जी मुलगी होती तिने विष्णूची व्यथा ऐकली. ती मुलगी विष्णूच्या बाजूला जाऊन बसली… ती विष्णूला धीर देत म्हणाली, “ की होईल सगळे नीट तुम्ही काळजी करू नका, माझा नवरा आता सिरीयस आहे.. मला ही सुचत नाही काय करावे.. बघा ना कसं असतं, माझ्या नवऱ्याकडे पैसे खूप आहेत पण आयुष्य कमी आहे आणि तुमच्या बायकोला बरं करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत.. हे आयुष्याच संघर्ष असचं असते.. जे हवं असतं तेच आपल्याला भेटत नाही..” ती बोलत राहते आणि तो फक्त ऐकत राहतो आणि तो काहीच बोलत नाही.. नंतर ती निघून जाते.. विष्णूला अजून ही समजतं नसतं काय करावे.. तो बायकोच्या रूममध्ये जातो.. ती शांत झोपली असते.. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.. तिला जाग येते..

सीमा, “ कुठे होतास कधीपासून, मी इथे एकटीच होती ना..
विष्णू, “ अगं बाहेरच होतो.

सीमा, “ मला काय झालंय, काही सिरीयस गोष्ट नाही आहे ना..
विष्णू, “नाही गं, तू झोप शांत मी आलोच.

सीमाची व्यथा पाहून विष्णू आतून खूप रडत होता.. त्याला काय करावे सुचत नव्हते.. नंतर डॉक्टर समोरून आले ते म्हणाले आम्ही ऑपरेशनच्या तयारीला लागतोय.. तुम्ही इथेच बसा..

विष्णू चकित झाला.. पैसे कोणी भरले विचारात पडला.. तो काउंटरवर जातो. त्याला तिकडे कळते की एक मुलगी त्याच्या नावाने पैसे भरून गेली आहे. विष्णूला ती कॅबिन मधली मुलगी आठवते. तो काउंटरवर असलेल्या मुलीला विचारतो, “ज्यांनी पैसे भरले त्यांचा नवरा याच हॉस्पिटल मध्ये अॅडमीट आहे ना, त्यांचा रूम नंबर सांगाल का ते कुठे आहेत.. “ती म्हणते हो.. ते ३ नंबरच्या रूम मध्ये आहेत.. सीमाच ऑपरेशन चालू असते. विष्णू त्या मुलीच्या नवऱ्याला बघायला जातो.. जेव्हा तो त्या रूम मध्ये जातो. बघतो तर काय ?
तिचा नवरा या जगात राहिला नव्हता.. ती मुलगी ही त्याचा हातात हात देऊन बेड वर डोकं ठेऊन होती.. विष्णू ने तिला धीर देण्याचा विचार केला. त्याने तिला ताई हाक मारून बोलवले. समोरून काही उत्तर आले नाही.. विष्णू घाबरला.. तिला उठवायला गेला तेव्हा त्याला कळून चुकले होते की ही सुद्धा जग सोडून गेली होती.. विष्णूच्या डोळ्यात पाणी आले.. तो धावत जाऊन डॉक्टरांना बोलवायला गेला.. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले… तिचा नवरा अर्धा तास अगोदर जीव सोडून गेला आणि ती २५ मिनिटाअगोदर. दोघेही सोबत गेले होते.. विष्णू खूप दुखी झाला होता.. तेव्हा त्याला कळले की सीमाचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले आहे.. तो खुश होता पण मनात त्या मुलीचे आणि तिच्या नवऱ्याचे दु:ख होते. विष्णू सीमाला घरी घेऊन आला.. त्याने हॉस्पिटलमध्ये काय घडले ते सगळं सांगितलं.. सीमाला ही हे ऐकून वाईट वाटले.. सीमा म्हणाली, “असेही एक नाते जुडले तुमच्यात..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *