एक बाई विद्रुप झालेला चेहरा

By | May 20, 2020

गाव मंजरी, आमच्या गावामध्ये एक माने नावाचेकुटूबं राहत होते. ते गावातील सरपंच होते पण एक दिवशी त्याचा ह्रदय विकाराने मृत्यू झाला.. त्यानंतर त्याचा मुलगा विजय ला सरपंच पद देण्यात आले..पंचायत मध्ये बसलेला असतानच त्याला एक सुंदर मुलगी दिसली.. तो तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला.

थोड्या कालावधीने त्यांचे लग्न झाले. त्यानंतर विजय आपल पंचायतच काम संपवुन येण्यास त्याला रात्र होत असे किवा तो पंचायतच्या कामासाठी बाहेर जात असे.एक दिवशी विजय आपले काम संपवुन येत असताना त्याला काही माणसांनी सांगितले कि दर अमावस्याला व पौर्णिमेला तुझ्या घरातुन भयंकर आवज येतात व तिथे एक बाईचे विचित्र सावल्या दिसतात त्याला खुप जणांनी सांगितलेमग त्याने एक दिवशी आपल्या बायकोला सांगितले की, मी काहि कामासाठी बाहेर चालोय आणि येण्यास रात्र होईल असे म्हणून तो घरातुन निघाला.

काहि अतंरावर तो गेल्यावर त्याने आपला सामान तिथेच सोडून तो घरी आला व त्याने जे द्रुश्य तेथे बघितले त्याला झटकाच बसला कारण त्याच्या घरात एक बाई विद्रुप झालेला चेहरा आपल्या बाळाला घेऊन नाचत होती. त्याला ते पाहून झटकाच बसला त्याने गावतल्या एका देवदुश्याला हि सर्व घटना सांगितली त्या देवदुश्याने त्याला सांगितले की ती एक चुडेल आहे.

त्याने विचारले ह्याचा काही उपाय नाही का?. देवदुश्याने सांगितले अमावस्याला जेव्हा ती तिच्या खर्या रुपा मध्ये येणार तेव्हा तिच्या साडीचे ‘गोंडे’ कापून ते जाळून टाक त्यामध्ये तिची शक्ती आहे.काही दिवस गेल्यावर अमावस्याची रात्र आली. रात्रीच बारा वाजणार होते ती तिच्या रुपात येणार होती तो पर्यंत विजय तिथे आला. ती त्याला पाहून एकदमच दचकली. तीने आपला चेहरा लपवला आणि ती म्हणाली माझी तब्येत काही बरी वाटत नाही तुम्ही डॉक्टरला आणा.

विजय डॉक्टरला आणायला घरातुन निघाला बारा वाजता ती तीच्या रुपात आली आणि आपल्या बाळाला घेऊननाचु लागली. तिथे विजय अचानक पणे आला आणि तिच्या साडीचे गोंडे त्याने घट्ट धरुन ठेवले. जस-जसे तो गोंडे धरत तस-तसे ती जोरात रडत होती.. ते गोंडे कापले ती जोरात ओरडू लागली. मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. तेवढ्यात विजय ने ते गोंडे चुलीत टाकून दिले आणि ती नष्ट झाली.टिप – हि कथा खोटी वाटत असल्यास कोणी हि या कथेची चौकशी करावी आणि त्या चुडेल चा मुलगा आज चाळीस वर्षाचा आहे व तो मंजरीच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *