कावळा आणि कबुतरे

एकदा, एका कबुतरांच्या खुराड्यात, आपली पिसे पांढरी करून एक डोमकावळा शिरला. जोपर्यंत तो गप्प होता तोपर्यंत त्या कबुतरांना काही ओळखू आले नाही, परंतु आपले नवे घर पाहून त्या कावळ्याला इतका आनंद झाला की तो त्या भरात मोठमोठ्याने हसू लागला.

तेव्हा तो डोमकावळा आहे हे लक्षात येऊन त्या कबुतरांनी त्याला हाकलून लावले. तेथून तो आपल्या जातिबांधवात गेला. तेव्हा त्याची पांढरी पिसे असलेला विचित्र अवतार पाहून कावळेही त्याला आपल्यात घ्यायला तयार झाले नाहीत.

तात्पर्य

– भलतेच सोंग घेऊन दुसर्‍याला फसवणारा मनुष्य सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *