गरुड आणि चंडोल

एका चंडोल पक्ष्याला स्वतःच्या शहाणपणाबद्दल फार गर्व होता. सगळ्या पक्ष्यांची राज्यसूत्रे आपल्या हाती आल्याशिवाय सगळे पक्षी सुखी होणार नाहीत, असे त्याला वाटत असे. म्हणून एकदा त्याने गरुडाला, ‘मला आपल्या प्रधानमंडळात घ्या,’ अशी विनंती केली. तो म्हणाला, ‘महाराज सदर जागेला मी योग्य आहे.

माझा आवाज गोड आहे, मी अगदी जलद उडतो, हे तुम्हाला माहीत आहे. याशिवाय माझ्या अंगी बरेच चांगले गुण आहेत.’ याप्रमाणे तो स्वतःची स्तुती करीत आहे तोच त्याला थांबवून गरुड म्हणाला, ‘अरे, तुला वरचेवर भटकत फिरण्याची आणि सगळा दिवस बडबड करण्याची इतकी सवय आहे की, तुला जर माझ्या प्रधानमंडळात घेतलं तर तुझ्यासारख्या निरुपयोगी पक्ष्यांची निवड केल्याबद्दल सगळे पक्षी मला नावं ठेवतील.’

तात्पर्य

– मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक महत्त्वाच्या जागांना बहुधा नालायक असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *