एक माणूस खाण्याचे पदार्थ एका गाढवावर लादून नेत होता. त्याच्याबरोबर त्याचा कुत्राही होता. काही वेळाने तो थकून जाऊन एका झाडाखाली झोपला व गाढव इकडेतिकडे चरत राहिले. कुत्र्याला खूप भूक लागली म्हणून तो गाढवाला म्हणाला, ‘तुझ्या पाठीवरच्या खाण्याच्या पदार्थांपैकी मला थोडे देशील तर माझी भूक भागेल.’ तेव्हा गाढव म्हणाले, ‘थोडा वेळ थांब. आपला धनी जागा झाला म्हणजे तुला खायला देईलच.’ ते ऐकून कुत्रा गप्प बसला.
थोड्या वेळाने एक भला मोठा लांडगा तेथे आला व त्याने गाढवावर झेप घेतली तेव्हा गाढवाने कुत्र्याला आपल्याला वाचविण्याची याचना केली. तेव्हा कुत्रा उपहासाने हसून म्हणाला, ‘जरा वेळ थांब. आपला मालक जागा झाला म्हणजे तुझं रक्षण करेलच.’ एवढे तो म्हणेपर्यंत लांडग्याने गाढवाचे नरडे फोडून त्याला ठार केले.
तात्पर्य
– दुसर्यांनी आपल्याला मदत करावी असे जर वाटत असेल तर आपणही दुसर्याला मदत केली पाहिजे.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply