गावाकडचं प्रेम बघा आम्ही असचं करायचो

यात्रेदिवशी तेवढं देवाला नैवेद्य घेऊन जायचो,
नदीवरच्या पुलावर तिची वाट पाहत असायचो,
🌊ती यावी म्हणून आधीच देवाला नवस बोललेलो असायचो,
ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो🌰,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असचं करायचो 💘..

🏊 ती जेव्हा नदीकाठी यायची,
कमरेवर कळशी आणि मैत्रीण सोबत असायची,
आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो,
मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..

तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,
👰 नवरा भावबंद असल्यासारखं घोड्यासमोर नाचायचो,
💃तिनं बघावं म्हणून जोरात उड्या मारायचो,
ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो👩,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..

मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,
👦आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,
बघून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,
मग रात्री नुकताच विचार करत झोपायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..

शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,
📃आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,
😳📃कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,
तिचं लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..

तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,
रानामधी जाऊन सरीच्या अंकुराशी बोलायचो,
दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत राहयचो,
🚶मनामधी तेव्हा खरंच फार रडायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..

ती सोळाव्याला आली की तिला जाऊन भेटायचो,
कसं आहे सासर सारी विचारपूस करायचो,
नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,
आणि मग तेव्हा तिच्या मनातलं प्रेम आम्ही समजायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो💘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *