थोर स्थापत्यशास्त्रज्ञ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

डॉ. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६२ साली झाला.त्यांची मुंबई विध्यापीठाची एल . सी. ई. ही पदवी घेतली होती व १८८४ साली बांधकाम खात्यात नौकरी स्वीकारली. त्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारून म्हैसून संस्थानात स्थापत्यशास्त्र सल्लागार म्हणून काही वर्ष दिवानपद भूषवले.

म्हैसूनपासून १२ मैलावर कृष्णराजसागर हे प्रचंड धरण बांधणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या आज आपल्यात नाहीत. हे धरण दीड मैलांहून लांब. ११० फुट रुंद व १४० फुट खोल आहे. १४०० फुट खोल आहेत. ते दरवाजे पाण्याच्या पातळीप्रमाणे आपोआप उघडतात. डाव्या बाजूला काढलेल्या विश्वेश्वरैय्या कालव्यांसाठी डोंगर खोदून सुमारे चार हजार फुट लांबीचा बोगदा आहे. धरणाजवळ अतिसुंदर वृंदावन आहे. याशिवाय हैद्राबादच्या मुसा नदीला काबूत ठेवू न शहराचा धोका त्यांनी टाळला आहे. खडकवासला  धरणाला लागलेले पाण्याच्या पातळीप्रमाणे उघडणारे व बंद होणारे कळसूत्री दरवाजेही त्यांचीच कल्पकतेने प्रथम तयार केले. या त्यांच्या कल्पनेचा पनामा कालव्यातही उपयोग करण्यात आला.

भारतातही व महाराष्ट्रातील अनेक जलयोजनांचा आराखडा त्यांनी तयार केला. त्यामुळे कर्नाटकात सिमेंट, कागद, साबण, यांचे कारखाने उघडले गेले. भद्रावती येथे पोलादाचा कारखाना उभारून उकृष्ट प्रतीचे पोलाद निर्माण होऊ लागले.

१९२३ सालच्या लखनऊ येथे भरलेल्या विज्ञान परीषदेचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले.

‘कन्स्ट्रक्टिंग इंडिया’ व ‘लॉड इकॉनोमी ऑफ इंडिया’ हे त्यांचे ग्रंथही व्यासंगपूर्ण अधयनावर आधारलेले आहे. १४ एप्रिल १९६२ रोजी साली त्यांचे वृद्ध पकाळामुळे निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *