महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावलीप्रमाणे उभे राहणारे पं. नेहरू प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देशाच्या स्वातंत्राच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी सायमन कमिशनला विरोध करण्याचा कार्यक्रमात त्यांनी लखनौला लाठीमार सहन केला. ते आपल्या निश्चयाला चिकटून राहीले. निस्सीम देशभक्तीमुळे ते १९२९ च्या कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्रासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ साली भारताला स्वातंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंत्रप्रधान झाले. सतरा वर्ष त्यांनी भारताचे पंत्रप्रधान म्हणून काम केले. भारताचा आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळण्यासाठी व देशाचा भवितव्यासाठी त्यांनी स्वतः ला त्या कार्यात झोकून दिले होते.
देशाप्रमाणेच जगाला शांततेचा संदेश देऊन ‘पंचशील’ ही लाख मोलाची देणगी समस्त जगाला दिली. ‘शांतीदूत’ हि पदवी बहाल करून या राष्ट्र पुरुषास सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलावर जिवापाड प्रेम करत. लहान मुले त्यांना खूप आवडत. मुले देशाचे आधारस्थंभ आहेत ही जाणीव त्यांच्या ठा यी होती. २७ मी १९६४ रोजी या थोर पुरुषानेआपणा सर्वांचा निरोप घेतला. आकाशातील ताऱ्यांमधून एक तेजस्वी तारा निखळला.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply