तेनालीरामचे चातुर्य

एक दिवस राजा कृष्णदेवराय कोणत्या एका कारणामुळे तेनालीरामवर नाराज झाले होते व रागात येऊन त्यांनी भरलेल्या दरबारात तेनालीरामला सांगितले उदयापासून मला दरबारात तुझे तोंड दाखवू नको. त्यावेळी तेनालीराम दरबारातून बाहेर निघून गेला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा महाराज दरबाराजवळ येत होते तेव्हा एका चुगलीखोराने त्यांना हे सांगून भडकविले की, तेनालीराम तुमच्या आदेशाचे पालन न करता दरबारात उपस्थित आहेत. हे ऐकून महाराज भयंकर चिडले. तो चुगलखोर दरबारी पुढे बोलला – तुम्ही स्पष्ट सांगितले होते की दरबारात आल्यानंतर चाबकाचे फटके मिळतील याची पण त्यांनी पर्वा केली नाही. आता तर तेनालीराम आपल्या आदेशाचे पालन करणे शक्यच नाही.

राजा दरबारात आला. त्यांनी बघितले की डोक्यात मातीचा एक माठ घालून तेनालीराम काहीतरी विचित्र हावभाव करत आहे. त्या माठाचा चारी बाजूला प्राण्यांच्या तोंडाचे चित्र बनलेले होते.

‘तेनालीराम हा काय मुर्खपणा चालविला आहे, तू माझ्या आज्ञेचे पालन केलेले नाही. महाराज पुढे बोलले की, शिक्षा म्हणून चाबकाचे फटके खायला तयार रहा.’

‘मी कोणत्या आज्ञेचे पालन केले नाही महाराज?’ माठात तोंड लपवून तेनालीराम बोलला – ‘तुम्ही बोलला होतात की, उदया मला दरबारात तुझे तोंड दाखवू नकोस, तुम्हाला माझे तोंड दिसते आहे का?’

हे देवा! कुभांराने मला फुटलेला माठ तर नाही ना दिला.

हे ऐकताच महाराजांना हसू आले व ते बोलले – तुझ्यासारख्या बुध्दिमान आणि हजरजबाबी बरोबर कोणी नाराज होऊच शकत नाही. आता हा मातीचा माठ डोक्यावरून काढ व आपल्या जागेवर आसनस्थ हो. “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *