तो पावसात आणि ती त्याच्या प्रेमात

तो👦 आणि ती👧 दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला असतात…
त्याच्याकडे रेनकोट असतो..
पण ते तो बॅगेतच🎒 ठेवतो आणि भर पावसात☔ उगाच भिजतो…
कारण त्याला माहित असतं कि त्याला पावसात भिजताना पाहून ती त्याला स्वतःच्या छत्रीत 🌂नक्कीच घेईल…
आणि पुढचं काय ते तुम्हाला इथे सांगायची गरज नाही…
ही तर नेहमीची ट्रिक झाली…

आता एक नवीन ट्रिक💡…
पाऊस ☁☔जोराचा पडतोय..
पण ती निघायच्या आधी तो तिची छत्री🌂 लपवून ठेवतो..
तिला छत्री काही केल्या सापडत नाही…
आता ती या विचारात आहे कि घरी🏠 कसे जायचे..
तो येतो आणि तिला स्वतःचा रेनकोट देऊ करतो…
ती आधी नाही म्हणते पण शेवटी ती तयार होते…
आता दोघेही👫 पावसात आहेत..
दोघेही भिजत आहेत…
तो पावसात आणि ती त्याच्या प्रेमात💑…

टीप:
१. पावसात जरासे भिजल्यामुळे सर्दी-ताप ज्यांना होतो त्यांनी जरा जपून..😉
२. छत्री लपवून ठेवणे हे चुकीचे आहे पण प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं असं तुम्ही कुठेतरी वाचलेलं असेलच…😜

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *