प्रेम असावे तर कृष्ण आणि राधा सारखे

रुक्मिणी ने जेवणा नंतर श्री कृष्ण यांना दुध पिण्यास दिले. दुध जास्त गरम असल्यामुळे ते त्यांच्या हृदयास लागले आणि त्यांच्या मधुर वाणीतून “राधे” नाव बाहेर पडले.
हे ऐकून रुक्मिणी म्हणाली की,
“प्रभु ! असे काय आहे राधे मातेत?, जे तुमच्या एक एक श्वासात त्यांचेच नाव आहे. मी पण तर तुमच्यावर खूप प्रेम करते, परंतु तुम्ही मला कधीच हाक मारत नाही”

तेव्हा श्री कृष्ण म्हणाले की,
“ रुक्मिणी तुम्ही कधी राधा ला भेटले आहात का?”
(आणि श्री कृष्ण मनातच हसू लागले)
दुसऱ्या दिवशी रुक्मिणी राधा ला भेटण्यास त्यांच्या राजवाड्यात गेली.
त्यांना राजवाड्या बाहेरच एक सुदंर स्त्री दिसली.

त्या सुंदर स्त्री च्या चेहऱ्यावर तेज पाहून रुक्मिणीला वाटले हीच राधा असावी आणि ती तिथे जाऊन त्या स्त्रीच्या पाया पडते. तेव्हा ती स्त्री तिला विचारते की, “तुम्ही कोण आहात ?” तर ती म्हणते, “मी रुक्मिणी आणि ती तिचे येण्याचे कारण सांगते”. तेव्हा ती स्त्री म्हणते की, “मी तर राधा मातेची दासी आहे. राधा माता तुम्हाला या राजवाड्याच्या सात दरवाज्या नंतर मिळेल.” रुक्मिणी ने सात दरवाजे पार केले आणि प्रत्येक दरवाज्यावर एक सुंदर स्त्री बघून त्यांनी विचार केला की त्यांच्या दासी इतक्या सुदंर असतील तर, त्या स्वतः किती रूपवान असतील. जेव्हा त्या राधा मातेच्या कक्षात पोहचल्या तेव्हा त्यांनी बघितले की एक तेजस्वी असलेला चेहरा जो सूर्या पेक्षा जास्त चमकत होता. अत्यंत रूपवान असलेल्या राधा मातेचं त्यांना दर्शन झाले.
रुक्मिणीने त्यांचे चरण स्पर्श केले. तेव्हा त्यांनी पाहिले की राधा मातेच्या शरीरावर छाले पडले होते. त्यांनी राधा मातेला विचारले. “तुमच्या शरीरावर हे छाले कुठून आले.” तेव्हा राधा माता म्हणाली की, “माता तुम्ही काल श्री कृष्ण यांना दुध पिण्यास दिले आणि ते गरम असल्यामुळे त्यांच्या हृदयात लागले आणि त्यांच्या हृदयात नेहमी माझाच वास आहे. त्यामुळे ते गरम दूध मला लागले आणि माझ्या शरीराला छाले पडले.” रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आले. ही प्रेमकहाणी आपल्याला अशी शिकवण देते की, नेहमी सगळ्यांच्या हृदयात रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *