प्रेम इथेच थांबत नाही

By | May 20, 2020

आजच्या युगातील प्रेम हे दिसण्यावरून होते हे नक्कीचं. पण त्या व्यक्तीचा स्वभाव बघून ही प्रेम होते हे जरा कमीच आहे.

सीमा आणि समीरचे छान चालू होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दोघं ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. ते दोघं एकत्र शाळेमध्ये असल्यापासून मित्र होते आणि त्यांच्या कॉलेज वर्षामध्ये त्यांना एकमेकांवर प्रेम झाले आणि आता सुद्धा डिग्री कॉलेज मध्ये एकत्र आहेत. सीमा समीरच्या करीयर बाबतीत जरा जास्त सिरीयस होती. कारण तिला वाटत होतं की त्याने प्रेमामुळे करीयर त्याग न द्यावा. म्हणून ती त्याला नेहमी त्यांच्या भविष्याबाबत सुचवायची.
दोघांना ही पुढे डिग्री मिळते दोघेही छान मार्कांनी उतीर्ण होतात. आता दोघांनी ठरवले होते की आपल्या नात्याबद्दल घरी सांगावे आणि लग्न करून सेटल व्हावे. दोघे ही घरी सांगतात. दोघांचे आई वडील ही राजी होतात. आता फक्त बाकी होतं ते जॉब बघून सेटल व्हायचं.

पुढे समीरला एक जॉब ऑफर येते. तो खूप खुश होतो आणि तो इंटरव्यू करिता जॉबला जातो. त्याला जॉब ही मिळतो. सगळ सुरळीतपणे चालू होतं. पाच सहा महिने उलटून जातात. त्याने त्याच्या लग्नासाठी सेविंग सुद्धा केली असते. आता फक्त बाकी होतं ते लग्न ठरवायचं.

तो सीमाला खूप काही बोलतो आपण असे घर घेऊ आपण तिथे दोघेच राहू आणि विकेंडला आईबाबा कडे येऊ मग तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा आणि आपण दोघं मस्त विकेंड एन्जोय करू. हे ऐकून सीमा ही खुश होते. तिला ही तसेच हवे होते.

पण एकदिवस समीरला बॉस बोलवतात त्याला कामासाठी बाहेरगावी जावे लागेल असे बॉस त्याला सुचवतात. तो ही घरच्यांची आणि सीमाची परवानगी घेतो आणि बॉसला होय असं उत्तर देतो. एक महिन्याकरिता बाहेरगावी जाणार आहे म्हणून तो तिला एक पूर्ण दिवस वेळ देतो. त्या दिवशी ते लोकं एका समुद्र किनाऱ्यावर जातात आणि समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले असतात. समीर सीमाला म्हणतो, “मला एक महिना सुद्धा एक वर्षासारखं वाटतं आहे गं. आपण लहानपणापासून सोबत आहोत आणि मी तुझ्यापासून एवढे दिवस लांब जाईल अशी वेळ सुद्धा आली नव्हती कधी.” सीमा म्हणते, “अरे यात वाईट का मानून घेत आहेस, फक्त एक महिनाच ना.. नंतर परत आपण एकत्र राहणार आणि आता तर लग्न ही होणार आहे आपलं. मग आपण एकत्रचं राहणार.. हो ना आता मस्त एक स्माईल दे. मग तो तिच्या मांडीवर डोक ठेवून थोडावेळ तेथे झोपी जातो. सीमा त्याची केसं कुरवाळत त्याला म्हणते, “की उद्या मी नाही येणार तुला सोडायला.. कारण मला रडू येईल तुला जाता वेळी बघताना.. तू जेव्हा येशील ना इंडियामध्ये तेव्हा मी तुला इथे या बीच वर भेटेन. Promise कर तू पहिला मलाच भेटायला येशील. तो म्हणतो, “हो”

तो एक महिन्यासाठी जात होता, म्हणून त्याने तेथील सीम नाही घेतले. तो तिथून एका मित्राच्या फोन वरून घरची आणि तिची खबर घेत होता. पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो खूप व्यस्त असल्याने त्याला घरची आणि तिची खबर काही घेता आली नाही. जेव्हा तो इंडियात आला तेव्हा प्रथम तो समुद्रकिनारी गेला तिला भेटण्यासाठी. ती तिथे त्याची वाट बघत बसली होती. तो आला आणि पाठून तिचे डोळे मिटले.

ती, “आलास, किती उशीर मी किती वाट बघतेय तुझी.. मला जायचं आहे ना उशीर होईल..”

तो, “सॉरी गं पिल्लू… कशी आहेस मला माफ कर मी गेले सात दिवस तुझ्याशी बोललो नाही.”

ती, “असू दे तू आलास ना आता काही टेन्शन नाही..”

तो, “तू नक्की रागवली नाही ना… हशशSS मला वाटला तू भरपूर रागवली असणार..”

ती, “नाही रे मी का रागवू तुझ्यावर..”

तो, “पिल्लू तू थांबशील का इथे जरा वेळ, मी माझे सामान घरी ठेवून येतो पटकन आणि आईबाबांना फक्त चेहरा दाखवून, लगेच येतो… तू थांब मग आपण खूप बोलू…

ती, “हो..

तो घरी जातो तेव्हा घराला कुलूप असते.. तेव्हा त्याला बाबांचा फोन येतो..
बाबा, “कुठे आहेस आलास का ?
तो, “हो तुम्ही कुठे आहात ?
बाबा,” सीमाच्या घरी तू ये लवकर इथे.
तो,” हो आलोच.
( तो सामान बाजूच्या काकींकडे देतो आणि जातो. )

तिच्या घरी जाताचं सगळे शांत होते.. मला वाटलं मला काही तरी Surprise मिळणार आहे. जरा पुढे गेलो तर आई रडत रडत मला मिठी मारते.
आई, “सीमा आता आपल्यात नाही राहिली..”

तो, “काय आई ?? हो का.. बस आता.. थट्टा पुरे झाली.. मी आत्ताच तिला भेटून आलोय. अजून ती माझी वाट पाहत आहे तिकडे.. मला तुम्हाला भेटून परत जायचे आहे तिकडे..

( घरातील सगळे आश्चर्य होतात…. समीरच्या आईला कळले होते की आता आपल्या मुलाला खूप जोराचा धक्का बसलेला आहे म्हणून तो असे काही तरी बोलत आहे.. सीमा चे अंतिमसंस्कार बाकी होते. त्याचं क्षणी हॉस्पिटल मधून सीमाची बॉडी घरी आणली जाते.. समीर पाहत्या क्षणी रडू लागतो.. तो आईला सांगतो की मी आत्ताच तिला भेटून आलो आहे आई.. ती समुद्रकिनारी माझी वाट पाहत आहे.. आईला त्याचे दु:ख बघवत नाही.. ती त्याला सीमा सोबत काय झाले ते सांगते..)

आई, “काल जेव्हा सीमा अंघोळीला जात होती तेव्हा पाणी गरम करण्यासाठी तिने हिटर टपात टाकले होते.. तेव्हा अचानक लाईट गेली.. लाईट गेल्यामुळे सीमा हिटर काढत होती. जेव्हा तिने हिटर हातात घेतले तेव्हा अचानक लाईट आली आणि त्या हिटरचा शॉक तिला लागला आणि ती थोड्या दूर वर उडून पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला आणि ती तेथेच मरण पावली.
(हे सगळं ऐकून समीर खूप दुखावला. त्याला कळून चुकले होते की ती मरून सुद्धा माझ्यासाठी तेथे आली होती.. तो धावत परत त्या समुद्राकिनाऱ्यावर जातो. त्याला ती तेथे दिसते आणि एक मस्त स्माईल देते. तो धावत जातो तिच्याकडे. त्याच्या मागे लगेच त्याचे आईबाबा आणि सीमाचे आईबाबा येतात.)

तो, “नको ना जाऊ मला सोडून.. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी तुला ठाऊक आहे ना..

ती, “माझ्यासोबत इथे बस आधी…
(तो बसतो…)
ती, “ हो मला माहित आहे.. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही.. म्हणून तर मी देवाशी ही लडणार आहे. त्याला म्हणेल माझ्या पिल्लूला पाहण्यासाठी मला महिन्यातून एक दिवस देत जा. नेहमी मी तुला इथेच मिळेल.. महिन्याच्या अखेरी तू मला इथे भेटायला येत जा…

तो, “मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय…. नको जाऊस मला सोडून प्लीज. नाही तर मला ही घेऊन जा तुझ्यासोबत..

ती, “असं नाही बोलायचं… आईबाबांना कोण सांभाळेल. त्यांच्याकडे आता फक्त तूच एक आधार आहे आणि माझ्या आईबाबांना ही सांभाळशील ना.. मला वचन दे..

तो,” हो.. मी त्यांना सांभाळीन..
ती, “ चल मग मी निघते..
तो, “ पिल्लू थोडा वेळ थांब ना… मला तुझ्या कुशीत एकदा झोपायचे आहे…
ती, “ ते शक्य नाही… मला घायचे असले तरी मी नाही घेऊ शकत तुला कुशीत.. मी निघू आता..
तो, “ पिल्लू निघते नाही बोलायचं येते बोलायचं… तू येशील ना इथे मला भेटायला..
ती, “ हो
( ती त्याला गोड स्माईल देते आणि निघून जाते… हा नेहमी तिला महिन्याच्या शेवटी भेटायला जायचा. त्याला तिची सवय झाली होती…समीर आता मानसिक रोगी झाला होता.. त्याला तिची सवय झाली होती.. महिन्याचे सर्व दिवस तो एका कोपऱ्यात तिचा फोटो घेऊन बसायचा आणि वेड्यासारखा वागायचा.. पण महिनाअखेर आली की तो बरोबर त्या समुद्रकिनाऱ्यावर जायचा… ती त्याला भेटायला यायची… अजून पर्यंत कोणी तिला पाहिले नव्हते तो एकटाच बडबड करत बसायचा.. डॉक्टर ही म्हणाले होते.. जोपर्यंत ती त्याचासोबत असेल तोपर्यंत तो चांगला वागेल आणि नंतर तो परत त्याच्या त्याच अवस्थेत येईल. कारण त्याचा एकटेपणा त्याला त्या आजाराकडे खेचून घेऊन जातो. जेव्हा ती त्याचासोबत असते तेव्हा तो त्याचा एकटेपणा विसरून परत नॉर्मल होतो. )
कोण म्हणते मेल्यानंतर ही प्रेम अधुरे राहते सीमा आणि समीरचे प्रेम अजून ही तसेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *