प्रेम करा पण प्रेमात Timepass नको

By | May 20, 2020

तो – I Love You
ती – फक्त एका अटीवर हो बोलेन.
तो – अट सांगून तर बघ.
ती – जर आयुष्यभर साथ देणार असशील तरच हो बोलेन.
तो – अगं राणी ही काय अट झाली का, मी तर सर्वस्व तुझाचं झा
लोय गं, मला आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्या सोबतचं काढायचं आहे.

(ती निर्भान होऊन त्याचा शब्द न् शब्द ऐकत होती, तिला विश्वास बसत नव्हता की कुणी तिच्यावर सुद्धा इतकं प्रेम करणार आहे, तिने एक ही क्षण न घालवता त्याला हो बोलून टाकलं, दोघे एकमेकांसोबत खुप खुश होते वेळ पण छान जात होता, गप्पा टप्पा, भेटी- गाठी, रूसवा-फुगवा, जे प्रेमात असतं ते सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं की अचानक तिला एक प्रश्न सारखा सतावू लागला, त्याने पण तिच्या मनातला अस्वस्थपणा बरोबर हेरला)

तो – काय गं पिल्लू काय झालं माझं काही चुकलं का?
ती – नाही रे तुझं काहीच नाही चुकलं.
तो – मग तू इतका विचार कसला करत आहेस, दोन दिवस झाले पाहत आहे मी तू खुप टेंशनमध्ये आहेस.

(त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळयातून चटकन पाणी आले व ती बोलू लागली)

ती – तुझ्या घरचे मला Accept करतील ना रे…
..
तो – अगं बस एवढचं कारण आणि तू एवढं टेंशन घेतलं आहेस मी आजच बोलेन घरच्यांशी.

(एवढं बोलून तो निघून गेला, ती त्याच्या पाठमोरी आकृतीकडे पाहतच राहीली )

तो – आई बाबा मला तुमच्याशी खुप महत्वाचं बोलायचंय.
वडील- काय बोलायचंय.
आई – अरे बोल ना बाळा काय झालं.
तो – माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय….

(हे ऐकताच त्याच्या वडिलांना त्याचा खुप राग आला, त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या आवेशातच त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली, त्याची आई मध्ये आली व बोलू लागली)

आई – अरे तुला कळतंय का तू हे काय बोलतो आहेस, तुझी हिंमत झालीच कशी आमच्याशी असं स्वत:च्या लग्नाबद्दल बोलायची, हेच संस्कार दिलेत का आम्ही तुला, कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास ठाऊक….

(“कोण कुठली मुलगी पसंत ……केली आहेस कुणास ठाऊक” हे त्याच्या आईचे शब्द त्याच्या कानावर पडताच त्याला राग अनावर झाला)

तो – आईईईईई…..! मला हवं तेवढं बोला पण प्लीज तिला नका काही बोलू, खुप खुप खुप चांगली आहे गं ती खुप प्रेम करते ती माझ्यावर….

(हे ऐकताच त्याची आई स्तब्ध झाली, तिला कळून चुकलेलं की त्याची काहीच चुक नव्हती तरीही आपण त्याला बोलत आहोत, पण त्याचे वडील काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते)

वडील- तू काहीहि बोललास तरी आम्हाला हे पटलेलं नाही, आता तू हा विषय काढून टाक डोक्यातून.

तो- बाबा जर हेच वाक्य मला जर बहिण असती आणि तिला वापरलं गेलं असतं किंवा तिला जर या परिस्थिती सामोरं जावं लागलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं…

(हे ऐकून त्याचे वडील त्याच्याकडे पाहतच राहिले, त्याने ही लढाई जिंकली होती, त्याने होकार मिळवला होता, त्याच्या आई वडिलांनी मुलीला न पाहता लग्नासाठी परवानगी दिली होती. आता तिची बारी होती घरी सांगायची, त्याआधी दोघांनी भेटायचं ठरवलं.)

ती- मला खुप भीती वाटत आहे रे, खुप कडक आहेत माझे बाबा, मला मारतील ते मी जर हा विषय काढला तर…
तो- मग काय करायचं ठरवलं आहेस.
ती- तू ये ना प्लीज माझ्या घरी, तू सुरूवात कर मग मी सांभाळून घेईन सगळं.
तो- PROMICE.
ती- हो रे बाबा PROMICE.
तो- ठीक आहे मी येतोय उद्या तुझ्या घरी, तू फक्त तयार रहा OK.
ती- OK..

(ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला, त्याने सगळी परिस्थिती तिच्या वडिलांना सांगितली तिच्या वडिलांचा रागाचा पारा चढला, तळपायाची आग मस्तकात, तिला जोरात हाक मारून बाहेर सगळ्यांसमोर बोलवण्यात आलं, ती थरथर कापत होती, दरदरून घाम आलेला, तिची अग्निपरीक्षा तर नव्हती पण त्यापेक्षा कमी पण नव्हती, ती बाहेर आली सर्वांसमोर, तिला विचारण्यात आलं की हा मुलगा जे बोलतो आहे ते खरे आहे काय, तिला फक्त हो किंवा नाही हे उत्तर द्यायचं होतं, त्याने त्याची कामगिरी एकदम चोख बजावली होती आता तिची बारी होती, तिने त्याच्याकडे पाहिले तो आशाभूत नजरेने तिच्याकडे पाहत होता बहुतेक त्याला कळून चुकलेलं की ती भितीपोटी माघार घेईल, वातावरण खुप तापलेलं होतं, सगळे तिच्या उत्तराची वाट पाहत होते, ती बोलू लागली) …

ती – बाबा खुप विश्वास आहे ना तुमचा तुमच्या लेकिवर, तर मग माझं पण हे कर्तव्य बनतं की माझ्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगावी जर मी तुम्हाला हे नाही सांगितलं तर मी तुमचा विश्वासघात केल्यासारखं होईल. बाबा तो जे जे बोलत आहे ती एक न् एक गोष्ट खरी आहे, हो प्रेम करते मी त्याच्यावर आणि तुमची परवानगीने मला लग्न करायचंय त्याच्याशी, प्लीज बाबा एकदा सकारात्मक पणे विचार करा आमच्या नात्याबद्दल आणि हो तुमच्या पद्धतीने त्याची कसोटी घ्या पण प्लीज एकदा त्याचा विचार करा…..

(तिच्या घरचे सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते अन् ती बेभान होऊन आपल्या प्रेमाची बाजू मांडत होती, आणि तो आनंदाश्रू ढाळत तिच्याकडे कौतुकाने पाहत होता, त्याला गर्व वाटत होता की एका खुपच जबाबदार व समजुतदार मुलीशी तो प्रेम करत होता) यानंतर काय…. अहो काय होणार तिचे वडिलांनी काहीच प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले व काही वेळांनी परत आले व तिच्याकडे पाहून एक मस्त स्माईल दिली, तिनेही जराही विलंब न करता बाबा अशी मोठी किंकाळी मारून बाबांना जोरात मिठी मारली…. मित्रांनो आता हे सांगायला नको की त्यांच लग्न झालं, प्रेम करायला सोपं आहे पण ते निभवायला वाघाचं काळीज लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *