प्रेम ही भावना स्वर्ग ही जिच्यासमोर जणू काहीच भासत नाही
तो. . . वय २५.. तसा मुळचा मुंबईचा पण शिक्षणासाठी पुण्यात जोश्यांकडे राहायचा
ती. . . वय २२.. नृत्य शिकायची आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच रहायची
तिचा नकार पण तो तिचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आज ही तिच्या पाठी घराजवळ पोहोचतो पाठीमागून तो येतच असतो शेवटी हतबल होऊन
ती, “तुला नक्की हवंय तरी काय?”
तो, “तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं हवंय तरी काय.”
ती, “माझं लग्न ठरलंय निर्णय झालाय.”
तो, “तू आनंदी आहेस? नक्की?
हुम्म्म ती होकारार्थी मान हलवते.
तो मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात त्यांचा गैरसमज आणि डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो.. गालावरचा हात तसाच राहतो. बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे ही नजरे आड होतात. तिला अखेरच बघत तो नाहीसा होतो. अंधार पडू लागतो रस्त्यात समोरून येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते, अंगावर येणारा प्रकाश एक निमिष आणि मग सर्वत्र अंधार दोन महिने उलटतात फासे हळू हळू पालटू लागतात. दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन दिवस त्याचाच विचार करतेय. तिलाही कळत नाही असं का होतंय. त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती. आता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता. जीवाचं काही बरं वाईट तर करून नाही ना घेतलं. ती फार बैचेन झाली शेवटी जोश्यांकडे पोहचते. त्याचा मोठा अपघात झाल्याच कळत. ती त्याचा नंबर घेते. घाबरत घाबरत त्याला फोन लावते रिंग वाजते फोनही उचलला जातो तो तिचा आवाज ओळखतो. ती रडत असते. रडत रडत बोलत असते त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात. धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन जातात. तो काहीच बोलत नाही. दोघेही भावनाविवश होतात. तो फोन ठेऊन देतो. ती फोनकडे बघत राहते. तो बोलला का नाही. दोन दिवसावर लग्न आता तिला सगळं असह्य होत चाललंय. त्याला भेटण गरजेच आहे. कोणत्याही परिस्थितीत ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते. त्याच्या घरी पोहचते तो आताच पुण्याला निघाल्याच कळत तातडीने पुण्याची रेल्वे पकडते सीट जवळ येते आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही. तो समोर असतो काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात. तो एक कागद घेतो त्याचावर काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात देतो.
हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक,
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक,
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द,
कळतील तुला का ते बोल निशब्द,
भान हरपते कंठातील शब्द कंठात पोहचणार का?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का?
कागद निसटतो आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत.
पुढच्या मार्गाला लागतात मित्रांनो प्रेम ही भावना स्वर्ग ही जिच्या समोर जणू काहीच भासत नाही.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply