प्रेम हे जात आणि धर्म बघत नाही

आपण नेहमी प्रेमकथा वाचतो आणि आपल्याला ती प्रेमकथा वाचून आनंद सुद्धा होतो. कारण आपण ती प्रेमकथा वाचत नसून जगत असतो. आयुष्यात सगळ्यांना कोणावर तरी प्रेम होतेचं आणि अशा व्यक्ती वर जी नेहमी आपल्याला आपलीशी वाटते. तिच्या सुखासाठी आपण काही ही करायला तयार असतो. तिच्या आनंदामध्येच स्वतःचा आनंद समजून जगत असतो. प्रेमात कधीही आपण जात किंवा धर्म बघत नाही.

जोयाच्या वडिलांचे बदली त्यांच्या गावातून दुसऱ्या शहरात झाली होती. म्हणून जोयाचे अॅडमिशन त्या नवीन शहरात करण्यात आले. पण काही कारणावरून परत जोयाच्या वडिलांचे बदली त्यांच्या गावीच झाली. पण जोयाचे अॅडमिशन इथे झाले होते. तर आता जोयाच्या शिक्षणासाठी काय करावे हा प्रश्न त्यांना पडला. तर जोया म्हणाली की, “मी येथे आत्या कडे राहते एक वर्ष आणि पुढच्या वर्षी परत आपल्या गावी येते”. मग तिच्या वडिलांनी जोयाला तिच्या आत्याकडे सोडले. कॉलेजचा पहिला दिवस होता. जोया कॉलेजला गेली. तिथे तिने खूप साऱ्या मैत्रिणी बनवल्या. तिच्या वर्गात एक साईराज नावाचा मुलगा होता. तो तिला चोरून चोरून बघायचा. त्याला तिचे नाव माहित नव्हते. ती जेव्हा कॉलेजला यायची तेव्हा तो तिची वाट बघत गेट जवळ बसायचा. जेव्हा ती घरी जायची तेव्हा ही तो गेट जवळ तिची वाट पाहायचा. जोया त्याच्याच वर्गात आहे हे त्याला माहित नव्हते.

एक दिवस त्याला माहित पडले की ही मुलगी त्याच्या वर्गातलीच आहे. तेव्हा पासून तो सगळे lecture बसायचा. तो तिलाच बघत राहायचा. एक दिवस हे जोयाला कळाले की हा मुलगा आपल्याला बघत असतो. तिला भीती वाटायला लागली. म्हणून ती दुसऱ्या दिवशी पासून गुरखा घालून यायला लागली. साईराज बिचारा तिची वाट पाहत होता. पण त्याला कुठे माहित जी गुरखा घालून आहे तीच जोया आहे. असे खूप दिवस झाले. जोया त्याला नेहमी बघायची की तो माझीच वाट पाहत आहे. तिला वाईट वाटले. ती दुसऱ्या दिवशी पासून गुरखा घालून यायचं बंद झाली. जेव्हा साईराज ने जोयाला पाहिले तर त्याला राहवले नाही तो तिला जाऊन म्हणाला की, “एवढे दिवस तू कॉलेजला का नाही आलीस” ती म्हणाली की, “मी यायची, पण गुरखा घालून यायची” तो म्हणाला, “ का गुरखा का तू मुसलमान आहेस का?” ती हो म्हणाली. तेव्हा त्याला खूप भीती वाटली की मी जिच्यावर प्रेम केलं ती दुसऱ्या धर्मातली होती आणि हे माझ्या घरी कधीच चालणार नाही. तेव्हा तो तिथून निघून गेला. जोयाला वाईट वाटले की हा असा अचानक का निघून गेला. ती एकदम कासावीस झाली. खूप दिवस तो कॉलेज ही आला नाही. कदाचित तिला त्याच्याविषयी काही तरी वाटत होते.

एक दिवस तिने त्यांच्या मित्रांना विचारले तेव्हा ते म्हणाले की तो गावी गेला आहे. जेव्हा तो कॉलेजमध्ये आला तेव्हा ती जाऊन त्याला म्हणाली की, “एवढे दिवस तू कुठे होतास आणि त्या दिवशी अचानक निघून का गेलास?” तो काहीच म्हणाला नाही आणि तिथून निघून गेला. ती धावत त्याच्या मागे गेली आणि त्याला म्हणाली की, “मला तुझ्याशी काही तरी बोलायचे आहे. आज संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर मला पाठच्या गार्डन मध्ये भेट मी तुझी वाट पाहीन”. नंतर ती तिथुन निघून गेली. दोघेही एकाच वर्गात असून सुद्धा त्यांनी एकमेकांना पहिले नाही. जोयाला वाटत होते की तो येणार नाही तरी सुद्धा आपण जाऊन तिथे वाट बघूया. कॉलेज सुटले आणि ती गार्डन मध्ये जाऊन त्याची वाट पाहू लागली.

एक तास होऊन गेला होता अजून सुद्धा तो आलाच नव्हता. तिने विचार केला की आता निघायला हवे. जेव्हा ती तिकडून घरी जायला निघाली तर समोरच तो उभा होता. त्याला बघून तिला खूप आनंद झाला. ती धावत त्याचा कडे गेली आणि म्हणाली की, “एवढा उशीर का झाला.” तो म्हणाला की “तुला काही तरी बोलायचे होते ना ते आधी बोल.” ती म्हणाली की, “मला माहित होते तू मला कॉलेज चालू झाल्यापासून बघत होतास. वर्गात पण lecture चालू असताना सुद्धा मलाच बघायचा. मला भीती वाटायला लागली म्हणून मी गुरखा घालून यायची. पण तू माझी एवढा आतुरतेने वाट पाहायचा आणि मी तुला दिसायची नाही हे तुझ्या डोळ्यातले विरह पाहून मला खूप वाईट वाटले आणि दुसऱ्या दिवशीपासून गुरखा नाही घालायचे असे ठरवले. पण ज्या दिवशी तुला कळले की मी मुसलमान आहे तर तू तेव्हापासून मला बघायचे सोडून दिले आणि अचानक तू तुझ्या गावी गेलास. मला खूप वाईट वाटले कारण मला तुझी सवय झाली होती आणि तू अचानक बदललास आणि तू यायच्या आधी मला असे वाटले की तू नाही येणार म्हणून मी निघून जात होते पण तू आलास. कदाचित मी तुझ्यावर प्रेम करू लागली आहे. मला तुझे नाव सुद्धा माहित नाही आहे. तरीही तू मला आवडायला लागला आहेस. माझे बोलून झाले आहे मी जाते आता. मला माहित आहे मी दुसऱ्या धर्माची आहे आणि आपले लग्न कधीच होऊ शकणार नाही. काळजी घे”. ती जाण्यास निघते तेव्हा साईराज तिचा हात पकडतो आणि बोलतो “आता मी काही बोलू.” तेव्हा ती खाली मान घालूनच हो बोलते कारण तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला दाखवायचे नव्हते.

तो म्हणतो “अगं वेडी, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तेव्हा तर मला तुझे नाव आणि तुझा धर्म सुद्धा माहित नव्हता. तरीही सुद्धा मी तुझ्या प्रेमात पडलो. जेव्हा मला माहित पडले की तू मुसलमान आहेस तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्या आई वडीलांना समजवले की माझे प्रेम आहे आणि तुझ्या गावाची माहिती काढून तुझ्या घरी गेलो. तेथे तुझ्या आई वडिलांना विनंती केली की मला तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि हे तिला सुद्धा माहित नाही. त्यांनी लगेच परवानगी दिली नाही. त्यांनी मला सांगितले की जर माझी मुलगी तुझ्यासोबत सुखाने राहील तर आमची काही हरकत नाही. फक्त एकच अट आहे तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावे. त्यासाठीच मी जेव्हा इथे परत आलो तेव्हा तुझ्याशी काहीच बोललो नाही. कारण मला तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम निर्माण करायचे होते आणि आज तू स्वतः मला भेटण्यास बोलवले आणि हो मला माफ कर मी एक तास उशिरा आलो, पण तुझ्यासाठीच. त्याने त्याचा खिशातून एक सोन्याची रिंग काढली आणि एका पायावर खाली बसून तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला Will You Marry Me. जोया खूप रडायला लागली आणि तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाली की हो आणि अल्ला या जन्मा नंतर जितके जन्म मला देईल ते तुझ्यासोबत घालवेन हे वचन मी तुला देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *