एकदा बाभळ शेजारच्या सागवानाला म्हणाली, ‘तुला आपल्या शक्तीचा एवढा गर्व वाटतो, पण वादळ आले की समजेल तू टिकतोस की मी टिकते.’
काही वेळाने खूप मोठे वादळ आले. तेव्हा सागवान ताठ उभा असल्याने उन्मळून खाली पडला. परंतु बाभळ मात्र नम्रतेने आपल्या फांद्या झुकवून उभी राहिल्याने ती वाचली.
वादळ संपल्यावर बाभळ खाली पडलेल्या सागवानाकडे बघून उपहासाने हासली. तेव्हा सागवान तिला म्हणाला, ‘तू अगदी मूर्ख आहेस. तू जी अद्याप उभी आहेस ती वादळापुढे नम्र झालीस म्हणून ! परंतु मी मात्र लढता लढता पडलो. दुबळेपणा दाखवून जिवंत राहण्यापेक्षा लढता लढता मरण आलं तर ते अभिमानास्पद होय !’
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply