महाबळेश्वर एक ट्रिप

महाबळेश्वर म्हणजे निसर्गाची किमया! रम्य वातावरण. काळे कभिन्न खडक, हिरवा निसर्ग, आणि मनमोहक दृश्य. उन्हाळा आणि पावसाळा या मधल्या कालावधीत तर पृथ्वीवर अवतरलेला स्वर्गच!

आणि वीकएंड ला जायची मजाच वेगळी! हे असं असल्यावर कोणाची इच्छा होणार नाही जायची?
त्याप्रमाणेच निशा,राहुल,निधी,आणि राकेश हे चौघेही निघाले होते महाबळेश्वरला. राहुलच्या गाडीने। शुक्रवारी रात्री निघायचा प्लॅन ठरला. सगळे गाडीत बसले. राहुल गाडी चालवत होता. निधी त्याच्या बाजूच्या सीटवर बसली होती. आणि बॅकसीट्सवर राकेश आणि निशा बसले होते. मग सुरू झाली ती गडबड, मस्ती,मजा आणि एकमेकांची खेचणे. राहुल आणि निधी च्या रीलेशनशिप बद्दल निशा आणि राकेश ला माहिती होती.फक्त ह्याबाबतीत घरचे अंधारात होते.

असो……
तर आता काही वेळातच सगळे महाबळेश्वरला पोहोचणार होते.तिथे पोहोचल्यावर राहायला जागा शोधणे भाग होते. शोधत शोधत ते मोडक सदन जवळ आले. सगळ्यानी आत प्रवेश केला. त्यांना काहीच वेगळे जाणवले नाही.फक्त आत गेल्यावर एक थंड वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून गेली.आत गेल्यावर कोणाची तरी चाहूल लागली.आणि काही वेळच गेला असेल तोच एक 30-35 वर्षाची बाई दृष्टीस पडली.”कोण आपण?” ह्या बंगल्याची मालकीण.वसुधा.

ओह. नमस्कार मी ओळख करून देतो. मी राहुल, ही निधी आणि हे दोघे निशा आणि राकेश. हम्मम छान वाटले भेटून.तुम्ही फ्रेश व्हा मी जेवण बनवून तुम्हाला बोलावते. be comfortable. सगळे फ्रेश होऊन येतात.जेवण सर्व्ह केलेले पाहून सगळेच डायनिंग टेबल वर ताव मारला. सगळे दमले असल्याने थोडी झोप घेऊन मग फिरायला जाऊ असे ठरले. काही वेळ आराम करून सगळे सुसाईड पॉईंट वर फिरायला गेले. सुसाईड पॉईंट असूनही सर्वांचे चित्त वेधले जाईल अशी सौंदर्यता पाहून चौघेही आ वासून पाहू लागले. आणि इतरांप्रमाणे तेही मोहून गेले. निधी ला उगाच मनात शंका येऊन गेली. कोणीतरी आपल्यालाच रोखून पाहत आहे. पण ती तेव्हढ्यापुरतीच. सगळे बंगल्यावर आले. बंगला पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि भीतीही. बंगला एवढा जुना का? आपण आलो तेव्हा renovate वाटत होता. जाऊदे असेल काहीतरी. चला आत जाऊ. आत जाताच चौघांची बोबडी वळते. आत फक्त कोळाष्टके आणि पालापाचोळा. चौघेही अख्खा बंगला फिरतात.

कुठेच कोणताही कुणीही राहत असल्याचा पुरावा दिसत नाही. ना वसुधा ना स्वयंपाकघरात काही अन्न शिजवल्याचा पुरावा. सगळ्यांची जरा टरकलीच.पण जरा सावरून सगळ्यानी पूर्ण बंगल्याची झडती घेतली. पण कुठं काहीच सापडले नाही. सगळी शोधाशोध झाली. पण कुठेच काही नाही. सगळे थकल्यामुळे झोपी गेले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि सोसाट्याचा वारा देखील वाहत होता. निधी ला विव्हळण्याच्या आवाजाने जाग आली. तिला तो आवाज खालून येत होता. तिने हिम्मत करून बेडरूम बाहेर पाउल टाकले.आणि घाबरतच खालच्या दिशेने पाहिले. तिची पाचावर धारण बसली. तीने जोरात किंचाळी फोडली. पण तोंडातून आवाज बाहेर येईना. तिने जे दृश्य पाहिले ते अती भयानक होते.

सकाळी जाग आली तेव्हा ती तिच्या रूम मध्ये होती. आणि तिच्या डोक्याशी राहुल बसला होता.व निशा आणि राकेश तिच्या समोर उभे होते. ती अजूनही भीतीने कापत होती.ती थोडी सावरल्यावर तिने घडलेली हकीगत सांगायला सुरुवात केली.”काल रात्री मला विव्हळण्याचा आवाज आला.म्हणून मी खोली बाहेर गेले. आणि खालच्या दिशेने पाहिले. आणि माझी बोबडीच वळली.खाली वसुधा आंटी होत्या. आपण या घरात जेव्हा आलो होतो तेव्हा हे घर जसे maintain होते तसेच होते. वसुधा आंटी ने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच घर आता आहे तसे झाले आणि वसुधा आंटी नाहीश्या झाल्या.आणि पुन्हा पहाते तर एक साडी फाटलेली डोक्यातून रक्त आलेली आणि त्यामुळे चेहऱ्याला केस चिकटलेली बाई तिच्या बुबुळे नसलेल्या डोळ्यातून एकटक माझ्याकडे बघत दात विचकत होती.आणि क्षणार्धात नाहीशी झाली.”सकाळ झाली. दिनचर्या आटपून सगळे जण रात्रीची वाट पाहत होते. शेवटी रात्र झाली. सगळे आज हॉल मधेच एकमेकांचा हात पकडून होते. आणि “ती” आली. पण ती आज खूपच सुंदर दिसत होती. जरीकाठाची साडी, नाकात नथ, पायात जोडवी,मंगळसूत्र, आणि कपाळाला चंद्रकोर.

अतिशय लाघवी भासत होती. सगळ्यानी हात जोडले,”हे बघ बाई आम्ही तुला ओळखत नाही. पण आम्हाला तुमची मदत करायला आवडेल. तुम्ही काळजी करू नका.” “मला मदत नको न्याय हवाय.तेवढा द्या” एवढेच म्हणून ती तिच्या त्या भयंकर रुपात आली आणि नाहीशी झाली. न्याय पण का?काय घडलंय तिच्या सोबत अस की ती न्याय मागतेय? त्यासाठी आज रात्री परत तिला आव्हान द्यावे लागेल. असे म्हणत राकेशने चहाचा घोट घेतला. पण कसा ? हाताशी चाळे करत निधी म्हणाली. आपल्याला तिची वाट पाहावी लागेल रात्री. रात्र झाली.सगळे हॉल मधेच बसून होते. “ती” आली. सगळ्यांचा थरकाप उडाला. अंगात कापरे भरले.ती तीच होती.वसुधा…..

तिने घडली घटना सांगायला सुरुवात केली.

“काही वर्षांपूर्वीची गोष्ट,सगळे सुरळीत चालले होते. माझे नाव सौ. वसुधा मोडक मी आणि माझे पती श्री. महेश मोडक आम्हीही इतरांप्रमाणे सुसाईड पॉईंट वर फिरायला गेलो होतो. आमचा लाडका मुलगा पार्थ सोबत. त्या दिवशी माझ्या आणि ह्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. खूप खुश होतो आम्ही.

पण………
पण अचानक आमच्या सुखावर विर्जण पडले माझे आणि मिस्टरांचे जोरदार भांडण झाले.आणि……. आणि त्यांनी मला गाडी खाली ढकलून दिले आणि मला तिथे रक्ताच्या थारोळ्यात ठेऊन निघून गेले. आजपर्यंत मी न्यायासाठी तडफडतेय. पण……..

मला न्याय हवाय…..

आम्ही मिळवून देऊ तुम्हाला न्याय. माझा नवरा गावी निघून गेलाय.पळसगाव चौघीनी तिथे लागलीच कूच केले. मि. मोडकांना पकडले. आणि पार्थ ची जवाबदारी स्वतःवर घेतली आणि पुन्हा त्या बंगल्याला भेट दिली. आईचे वात्सल्य पार्थ ला जाणवत होते. परत सगळ्यांना वसुधा मूळ रुपात दिसून ती मोक्षप्राप्तीच्या मार्गाला लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *