आज मला अतिशय अस्वस्थ वाटत आहे म्हणून मनातील विचार कागदावर लिहावे असे वाटते म्हणून मी हे लिहित आहे.. आज आठ ते दहा महिन्यात घडलेल्या इतिहासाची पानं मला जागवत होती.. आजचा निरोप अटळ होता. तो घेतला, पण मनाला परत येता येत नव्हतं. आपली फक्त तोंड ओळख होती.. कॉलेजला आल्यानंतर प्रथम तुलाच बघितलं..
नंतर कळले कि तू माझी जुनियर आहेस..फ्रेशेर्स पार्टी पासून तुला पाहत होतो अन तुझ्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन केव्हा बदलला ते कळलेचं नाही.. तुझं येणं तुझं जाणं हवहवंस वाटू लागलं.. तू एखाद्या दिवशी दिसली नाही तरी चुकचुकल्या सारखे वाटायचे.. तुझी काळजी वाटायची.. माझे मन प्रेमात पडल्याचा स्वीकार करत नसले तरी अंतर्मनात तुझ्यासाठी गुंतल्याचा भास होत होता. तू फार कमी बोलायचीस.. मला मात्र आवडत होतं तुझं असं अबोल राहणं.
तुझ्यात खरच एक वेगळेपण जाणवायचे. तुझ्या इतकं सोज्वळ कुणी नव्हतं… त्याच क्षणाला मला तुझ्याशी एक ऋणानुबंध, रेशीमगाठ बांधावीशी वाटली. मला नूतन कॉलेजचे वातावरण छान वाटू लागले. त्याचे श्रेय फक्त तुलाच.. मी मात्र नेहमी तुझ्याशी बोलायचं निमित्त शोधायचो. अशातच एक निमित्त आलं तुझ्या वाढदिवसाचं.. त्या दिवशी तुझ्याशी बोलणं झालं… वर्षभर कदाचित मी चूकलो ही असेल तुझ्या बाबतीत.
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी वर्षभर त्रास दिल्याबद्दल मी माफी मागितली. पण माझे अंतर्मन मला हे सांगत होते कि माझे तुला त्रास देणेही गोडच होते.. त्यात तुझ्यासाठी आपुलकी आणि जिव्हाळाच होता. त्रास द्यायचा आणि वरती विचारायचं “तू नाराज नाही ना”, “तुला राग नाही ना” पण तरी मी अजून क्षमादान मागतो आणि खर्या भावनेचं नेहमीचं मोल असतं जर का तू स्वच्छ भावनेनं जाणलं असतं.
माझं मन तुझ्याजवळ मोकळे करावे असे मला खुपदा वाटले..पण तशी वेळच येत नव्हती.. अखेर २ मे २००७ आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस. निरोपाची वेळ जवळ येत होती तशी तशी माझी हृदयाची धडधड वाढली होती.. आजपर्यंत जे वाटले नव्हते ते त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले. आजचा सूर्य मावळला कि तू मला दिसणार नाही किंवा कधी दिसशील? या विचाराने मन बैचेन झाले होते.. स्वत:च्या नकळत तुझ्यात इतकं गुंतलो कि त्याच्यात बाहेर येता येत नव्हतं.
कदाचित तुला पुसटशी कल्पनाही नसेल कि आपल्यावर कुणीतरी जीवापाड प्रेम करतंय. पण बरीच वेळ निघून गेली होती. कॉलेजच्या शेवटच्या दिवसानंतर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपल्यात दुरावाच वाढणार होता. त्या दिवसापसुन तुझे जग आणि माझे जग वेगळे असणार होते.. तू “नाही” हा शब्द अगदी सहज बोलून जाते हे माहित असल्यावरही मी तुला १ मे ला धाडस करून तुझ्याशी बोललो.. पण त्या दिवशी तू तुझ्या मनाचा कौल व्यवस्तीत नाही दिला.. तुलाच स्वता:ला सांगता येत नव्हतं. तुही प्रेम करत होती माझ्यावर..पण मनातलं गोड गुपित कोण सांगेल ना.. म्हणून मी धाडस केलं होतं..
असो प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते त्या त्या वेळी त्या व्हायला पाहिजे.. तुझं मन जर मोठं असेल तर एवढी एकच गोष्ट स्वीकार “कुणीतरी होतं माझं, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं.. माझी आठवण ठेवणारं. तुझ्यावर प्रेम केलाय अगदी निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं..पण कधी एकटं असतानाच्या भेटी, कधी सगळे एकत्र असतानाच्या भेटी..त्यात सगळ्याच्या नजरा चुकून एकमेकांना पाहणं..
तू हे कोणते पाश निर्माण केलेत. तू तुझ्या न दिलेल्या कौलवर ठाम रहा. मला मात्र तुझ्यावर प्रेम आहे हे कधीच विसरता येणार नाही.. आणि प्रत्येक वेळी मी सुचकच बोलत होतो जेणेकरून तुला माझ्या भावना कळाव्यात. तुझ्यावर असलेले माझे वेडे प्रेम मी तुला समजाऊ पाहत होतो. वेड्या अपेक्षेने तुझ्याकडे पाहत राहिलो. कळतनकळत तुझ्यात खूप गुंतलो. अखेर एक निरोपाचा क्षण आला आणि आपल्याला कायमचा दूर करून गेला. शेवटच्या क्षणी मात्र खूप त्रास झाला आणि आजची होतोच आहे. त्या दिवशी इतकच कळले कि निरोप जर अटल असेल तर कुणात जास्त गुंतू नय. “गळा दाटून येणे” किवा “भरून येणे” हे शब्द मी फक्त कथा कादंबऱ्यात वाचले होते. पण त्या दिवशी या गोष्टी मला जाणवल्या. आज तुही तुझ्या घरी, मी ही माझ्या घरी… खरं सांगू अद्यापही माझं मन तू ज्या बेंचवर बसत होती तिथेच रेंगाळतय. नूतन कॉलेजचं प्रिमायसेस आठवला कि जिकडे पाहावे तिकडे तूच दिसतेस.
आज मात्र मी घेतलेल्या तुझ्या काळजीची मला खूप आठवण येत होती. माझी सदभावना तुझ्याप्रती खरी होती. तू मला मनापासून आवडली होती हे त्या क्षणांचं सत्य आहे. तूच राज्य केलास माझ्या क्षणाक्षणावर… त्या शेवटच्या दिवशी खूप बोललो पण अजूनही असे वाटते कि तुझ्याशी खूप बोलायचे बाकी आहे.. कॉलेज मध्ये माझं काहीतरी राहून गेलंय हा विचार मला आजही छळत आहे.. आजचे हे लिखाण खूप अस्वस्थ असताना लिहित होतो.. कुणाचा ‘नाही’ हा शब्द मनाला अतिशय वेदना देऊन जातो. पण अजूनही असं का वाटत असावं कि तुझ्या मनाचा कौल व्यवस्तीत नाही दिला…