मी सगळे विसरून परत एकदा त्याची झाले.

( माझा ब्रेकअप होऊन चार दिवस झाले होते… तो मला सोडून गेला होता… माझे आयुष्य आता विखरले होते.. त्याच दिवशी माझी मैत्रिण मला भेटायला आली होती.. ती माझा उदास चेहरा बघून तेव्हाच म्हणते चल आपण जरा बागेत फिरून येऊ. मग मी तिच्यासोबत जाते. आम्ही एका बाकावर बसून बोलत असतो. )

ती, “ कशी आहेस खूप दिवसानंतर भेटत आहोत आपण ?
मी, “ हो गं, मी मजेत आहे तू कशी आहेस.. ?
ती, “ एकदम मस्त.. मग काय चालले आहे जीवनात… ?
मी, “ विचारू नकोस गं, खूप वाईट दिवस चालले आहेत सध्या..
ती, “ अच्छा.
( तिला माहित होते तिच्यासोबत काय झाले होते ते.. म्हणून तिने विषय बदलला आणि आमच्या लहानपणाच्या वार्ता चालू झाल्या.. त्यात मी खूप खुश झाले होते आणि काही वेळाकरिता मला त्याची आठवणचं झाली नाही.. नंतर माझ्या मैत्रिणीने मला सहजच एक प्रश्न विचारला )
“सगळ्यात जास्त काय करायला आवडतं गं तुला….??? “
मी म्हटलं, “स्वप्न पाहयला..
यावर ती हसू लागली..
वेडी आहेस का? कोणाला स्वप्न बघायला कसे आवडू शकते ?
मग मी ही हसले आणि म्हणाली अगं खरंच.. मला स्वप्नं पाहयला खूप आवडते..
ती विचारते,“ का असे वेड्या सारखे बोलत आहेस तू ?
मी म्हणाले,” कारण ती एकच जागा उरलीये आहे माझ्याकडे जिथे तो अजुनही भेटतो मला अगदी न चुकता….!!
ती म्हणते, “ साथ नाही दिली तुला त्याने विसरून जा त्याला..
मी म्हणाले,” ते शक्य नाही… खूप जीव जडला आहे त्याच्यावर माझा.. आता जरी तो माझा नाही राहिला. तरी मी शेवटपर्यंत त्याच्यावरचं प्रेम करत राहील.
( हे सगळं बोलत असताना माझ्या डोळ्यात पाणी येत होते.. डोळे पुसण्यासाठी मी हळूच पाठी वळले तिला कळू नये म्हणून… आणि बघते तर तो समोर उभा होता.. माझ्या डोळ्यातले पाणी हळूच गालावर आले होते… ते अश्रू त्याने ही पाहिले होते.. त्याचे ही डोळे पाणावले होते… मनात येत होते की सगळे प्रश्न त्याच्यासमोर मांडू.. की काय चुकी होती माझी… ?

तितक्यातच मिठी त्याने मारली आणि हळू आवाजात म्हणाला,” नाही राहू शकत गं तुझ्याशिवाय.. हिम्मत नव्हती तुझा सामना करायची म्हणून तुझ्या मैत्रीणीकडे विनवणी केली… तुझ्या मनातील माझे स्थान पाहून मी पस्तावलो.. एका हिऱ्याला मी गमवून बसणार होतो.. मला माफ कर.. आणि त्याचे हे ऐकून मी सगळे विसरून परत एकदा त्याची झाले.. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *