एकदा रात्री एका बाईचे हट्टी मूल फार रडू लागले. त्याला शांत करण्यासाठी आईने फार प्रयत्न केले, पण ते ऐकेना. शेवटी भीती दाखवावी म्हणून ती मुलाला म्हणाली, जर तू गप्प झाला नाहीस तर तुला दारात आलेल्या लांडग्याला देऊन टाकेन.’ त्याच वेळी एक लांडगा खरोखरच दाराशी आला होता.
त्याने बोलणे ऐकले व बोलल्याप्रमाणे आई मुलाला आपल्या स्वाधीन करेल अशा आशेने तो तेथेच थांबला. शेवटी मूल रडून थकले व झोपी गेले. मग त्या लांडग्याला उपाशीच रानात जावे लागले. वाटेत त्याला कोल्हा भेटला, त्याने विचारले, ‘मित्रा, तू ठीक आहेस ना?’ लांडगा म्हणाला, ‘अरे मित्रा, ते काही विचारू नकोस. मी वेडा एका बाईचं खोटं बोलणं खरं मानून फसलो नि सगळी रात्र उपास आणि जागरण करून कंटाळून गेलो.’
तात्पर्य
– एखाद्याच्या बोलण्यात सहज निघालेल्या शब्दावर विश्वास ठेवू नये, त्या शब्दांचा मागचा पुढचा संबंध काय आहे हे लक्षात न घेणे मूर्खपणाचे होय.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply