प्रोग्रामिंग का शिकावे ?

संगणक (कॉम्प्युटर) किंवा भ्रमणध्वनी (मोबाईल) किंवा अनेक इतर इलेक्ट्रोनिक उपकरणांवर आपण चे प्रोग्राम वापरतो ते प्रोग्राम बनवण्याची किंवा संगणकावर लिहिण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोग्रामिंग होय. आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक कामे करतो , तिच कामे आपण संगणकाद्वारे किंवा इतर उपकरणांद्वारे सुद्धा कधी कधी करू शकतो, तर अशीच विविध कामे आपण संगणकाला समजणाऱ्या भाषेत किंवा प्रोग्रामिंग भाषेमध्ये (Programming Language मध्ये ) संगणकाला समजाविण्याचे काम हे प्रोग्रामर करत असतो.
प्रोग्रामिंग का शिकावे ?
बरेचसे लोक हे प्रोग्रामिंग कडे जातात कारण त्यांना दररोज वेगवेगळी मजेदार आव्हान जिंकायला आवडते व बरेचसे प्रोग्रामर्स फक्त संगणक आवडतो म्हणूनही प्रोग्रामिंग कडे वळतात (मीसुद्धा त्यातलाच एक आहे). प्रोग्रामिंग शिकून अनेक मोबाईल साठी अॅप्स म्हणजेच अँडरॉईड अॅप्लिकेशन्स तयार करणे, मोबाईल साठी विविध खेळ(गेम्स) तसेच संगणकावर विविध प्रोग्राम्स किंवा गेम्स यात लोकांना फारच रस असतो. जर तुम्हाला फेसबुक अॅमॅझॉन किंवा ट्विटर यांसारखी संकेतस्थळे (websites) बनवायची असतील तरीसुद्धा तुम्हाला प्रोग्रमिंगच शिकावे लागेल.
अल्गोरिदम म्हणजे एखादे काम संगणक कसे करेल त्याची क्रिया. जर तुम्हाला अल्गोरीदम्स येत असतील तर त्यामुळे आपला मेंदू नक्की कसा काम करतो हेदेखील उत्तम प्रकारे समजते. जर तुम्ही एक्स्पर्ट प्रोग्रामर असाल तर तुम्ही स्वतः तुमचे अल्गोरीदम्स बनवू शकता. जेव्हा तुम्हाला एखादी नवी कल्पना सुचते तेव्हा तुम्हाला त्यासाठी अल्गोरिदम बनवावे लागते किंवा एखादे आधीपासून अस्तित्वात असलेले अनेक अल्गोरिदम तुम्ही आपल्या प्रोग्राम मध्ये वापरू शकता. जेव्हा लॅरी पेजला ‘गुगल’ची कल्पना सुचली तेव्हा त्याने त्यासाठी स्वतःचे असे पेज रॅन्क अल्गोरिदम बनवले होते. जे काळानुसार विकसित होत गेले.
प्रोग्रामिंग कडे नुसते करियर अॉप्शन म्हणून नाही तर एखादा छंद म्हणून देखील पाहिले जाते. तुम्ही ‘सी’ सारखी एकादी सोपी व एकदम बेसिक भाषा शिकूनही प्रोग्रामिंगला सुरुवात करू शकतो. प्रोग्रामिंग करून तुम्हाला जी मजा येते ते आणखी काही देऊ शकत नाही.
पैसे किती कमवाल ?
एखादा सामान्य भारतीय प्रोग्रामर हा वर्षाला भारतात ३ ते ४ लाख रुपये कमवतो. तसेच एक्स्पिरीअन्स व आपल्या ज्ञानाच्या बळावर तो अजून पुढे जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *