माझे कुटुंब

By | May 20, 2020

माझे कुटुंब इतर भारतीय कुटुंबांसारखे एक छोटेसे कुटुंब आहे ज्यात मी, माझे बाबा, माझी आई, माझी छोटी बहीण आहे. माझी आई सगळ्यांची काळजी घेते. आई मला आणि माझ्या बहिणीला दररोज सकाळी वेळेवर तयार करते. बाबा दररोज आमच्या कुटुंबासाठी उशिरा पर्यंत काम करतात. बाबा मला आणि छोट्या बहिणीला खूप लाड करतात. आम्हाला फिरायला नेतात, नवीन कपडे घेतात. माझी बहीण आणि मी एकत्र शाळेला जातो आणि दररोज एकत्रच खेळतो. आमच्या दोघांची टीव्हीच्या रिमोटवरून खूप भांडणे होतात. पण माझ्यावर आई ओरडल्या नंतर आईच्या ओरड्यापासून पासून ती मला वाचवते आणि मी तिला वाचवतो. आम्ही कोणीही आजारी पडलो तर आई रात्रभर जागी राहते आणि आमची काळजी घेते. घर सांभाळण्यासाठी बिना कंटाळा करता किंवा कोणतेही तक्रार न करता रात्र आणि दिवस कष्ट करते. हे सर्व करूनहि ती आमचा अभ्यास घेते. आई आणि बाबा दोघेही आमच्यासाठी खूप काही करतात. माझे माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.

पूर्वी आम्ही एकत्रित राहणारे कुटुंब होतो ज्यात माझे काका, काकी, चुलत भाऊ, चुलत बहीण, आजोबा ,आजी राहायचो. आम्ही सगळे एकत्र राहायचो तेव्हा खूप मजा असायची. मी दररोज माझ्या भाऊ आणि बहिणींबरोबर खेळायचो, खूप मस्ती करायचो. आमची खेळण्यात खूप भांडणे व्हायची. काका कधी-कधी कामावरून येताना सगळ्यांसाठी खाऊ आणायचे. माझी आजी खूप छान जेवण बनवायची. ती दर सुट्टीत माझ्यासाठी माझे आवडते गोड अनारसे बनवायची. रात्री आम्हाला झोपायच्या अगोदर गोष्टी सांगायची. कधी कधी ओरडायचीहि, पण सगळ्यांवर खूप प्रेम करायची. माझे आजोबा माझ्या साठी घोडा बनायचे, माझ्याबरोबर दररोज खेळायचे. आई बाबा कोणी रागावत असले तर लगेच मला वाचवायचे.

माझी आई आणि काकी आमच्या सर्व कुटुंबाची काळजी घ्यायचे. आम्हाला दररोज वेळेवर शाळेला तयार करायचे. दररोज जेवायला खूप काही नवीन नवीन बनवायचे. आमचे कुटुंब संयुक्त कुटुंब होते. सगळे एकमेकांवर खूप प्रेम करायचे, एक मेकाची काळजी घ्याचे. पण आता ते सगळे खूप लांब राहायला गेले. मला माझे काका, काकी, चुलत भाऊ, चुलत बहीण, आजोबा, आजीची खूप आठवण येते. आम्ही एकत्रित राहायचो तेव्हा घर खूप भरल्या भरल्या सारखं वाटायचे. आता आम्ही साधारण कुटुंब आहोत ज्यात मी, माझे बाबा, बहीण आणि आई आहोत. आता दर सुट्टीला मी सर्वाना भेटायला जातो. कधी कधी माझ्या मनात विचार येते कि कुटुंब नसते तर माझे काय झाले असते. मी एकटाच पडलो असतो. कुटुंबामुळे मला अशा कित्येक अविस्मरणीय आठवणी मिळाल्यात. माझे माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.

माझ्या कुटुंबात ७ लोग आहेत, आम्ही सगळे एकत्रच राहतो. आई, बाबा, १ बहीण, २ भाऊ आणि आमची आजी, आम्ही सगळे एकाच घरात राहतो. आमचे काही नातेवाईक याच शहरात राहतात तर काही पुण्यामध्ये, आणि काही गावी. मला खूप चुलत, मावस भाऊ बहिणी सुद्धा आहेत. आम्ही सर्वजण जेव्हा एकत्र गावी जातो, आम्ही खूप दंगा करतो. गावी आमचे खूप मोठे कौलारू घर आहे.

माझे कुटुंब मला खूप आवडते, आमच्यात खूप क्वचित भांडणे होतात. आणि झाली तरी ती लगेच मिटतात. माझ्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना खूप मदत करतात, एकमेकांना सांभाळून घेतात. एकत्र कुटुंब असण्याचा हा खूप मोठा फायदा आहे. आम्ही सगळे गणपती, दिवाळी, दसरा, बर्थ डे साठी एकत्र येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *