मुलगी वाचवा ! देशघडवा !

आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्यातुलनेत दिवसेन – दिवस घटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपलादेश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.
आजही समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच्याविचारांना तेथे काडीची ही किंमत नसते हे चित्र फारच विदारक आहे. आपल्या देशातीलस्त्रियांची पुरूषांच्या तुलनेत घटती संख्या हा विषय म्ह्णा अथवा समस्या काहीमहिन्याच्या अंतराने ऐरणीवर येत असते. पण सरकारणे त्यावर काही ठोस उपाय योजल्याचेजाणवत नाही. आपल्या देशातील या संबंधीत यंत्रणा कुचकामी ठरल्यात असंच म्ह्णावलागेल. मुलाच्या हव्यासा पोटी काही लोक चार-पाच मुलींना जन्माला घालतात पण नंतरत्या त्यांच्यासाठी ओझ ठरतात त्यामुळे ते त्यांच्या तब्बेतीकडे खाण्यापिण्याकडेदुर्लक्ष करतात. परिणाम स्वरूप कळ्या फुलण्या अगोदर कोमेजून नष्ट होतात. आतायापुढे देशात जन्माला येणार्या प्रत्येक मुलीची काळजी सरकारणे घ्यायला हवी. बदलतचाललेली सामाजिक परिस्थिती ही अगदी सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांनाही मुलगी नको याविचारापर्यत पोहचायला प्रवृत्त करते.

आपल्या देशात धर्म आणि संस्कृतीचा चुकीचाअर्थ काही अज्ञानी लोक लावत असतात त्यामुळे ही मुलींची संख्या घटताना दिसते. मुालगाहवा या हट्टापायी जर काही लोक चार-पाच मुलींना जन्म देत असतील तर ते देशाच्याहिताचेच आहे त्यामुळे जन्माला येणार्या सर्वच मुलींची जबाबदारी सरकारणे घ्यायलाहवी. हे झाले मध्यमवर्गीय माणसांच्या बाबतीत पण श्रीमंत वार्गाला एकच आपत्य हवेअसते ते आपत्य ही मुलगा असावा अशी काहींची इच्छा असते. यातूनच त्यांच्याकडूनमुलींचा गर्भात असतानाच जीव घेण्याचे प्रकार घडतात. मुलगा आपली म्हातारपणी काळजीघेईल या खोट्या आशेवर जगत असणारे मुलाचा अट्ट्हास करीत असतात. सर्वच जेष्टनागरिकांची काळजी जर सरकारणे उचलायची ठरवली तर यात बदल करता येईल. देशातील मुलींचीमुलांच्या तुलनेत घटती संख्या वाढेल पण त्यासाठी मुलींच्या जन्माला अवरोध करणार्याप्रत्येक घटकांचा मुलापासून सर्वनाश करावा लागेल. मुलगी वाचली तरच देश घडेल. हेकरण्यासाठी देशातील सरकार सह या संबंधित सर्वच यंत्रणांनी कसून प्रयत्न करायलाहवेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *