नागपंचमी

‘मासानाम् मार्गशीर्षोऽहमं’ असं म्हटलं असलं, तरी श्रावण माहीना हा अबालवृद्धांचा, स्त्रिया-मुलींचा आवडता महिना. प्रत्येक दिवस धर्मकृत्याचा म्हणजे आनंदाचा. वातावरणात थंडावा आलेला असतो. निसर्गाच्या सृष्टीसौन्दर्याने पृथ्वीचे तारुण्य अधिकच खुलून दिसते. अशा या श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी होय. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण येतो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. शेतकरी शेत नांगरत नाहीत, तवा चुलीवर ठेवत नाहीत, पदार्थ टाळले जात नाहीत, भाजी चिरली जात नाही, अशा अनेक गोष्टींची सांगड या सनाभोवती गुंफली आहे.
या सणाविषयी अनेक लोककथा आहेत. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आर्य, अनार्य व नागलोक यांचे भांडण सुरु झाले. भांडून दोन्हीकडची मंडळी कंटाळली. परंतु अघोर घेणे कमीपणाचे वाटत असल्यामुळे माघार कुणीच घेईनात. त्यामुळे बरीच वर्षे तेढ कायम होती. आर्य लोक सुशिक्षित व विचारी होते. भांडून व तेढ ठेवून दोघांचे नुकसान आहे, हे त्यांनी नागलोकांना पटवून दिले. आर्यांचे विचार त्यांना पटले. आपले वैर विसरून ते सर्व एकत्र आले. तो दिवस नागपंचमीचा होता. आर्य लोकांनी नागाची पूजा केली. त्याचा सत्कार केला. तो महिना श्रावणाचा असल्यामुळे, घरोघरी दूध भरपूर होते. त्यामुळेत्यामुळे सर्व नागांना दूध दिले. साळीच्या लाह्या खायला दिल्या. या घटनेने नागलोक खुश झाले. नागपंचमीला आमची जे पूजा करतील, त्यांना आम्ही त्रास देणार नाही, त्यांचं रक्षण करू, असं वचन नागलोकांनी दिलं. भारतीय संस्कृतीत समन्वयाचा जो गन आहे, तो गन नागपूजेच्याद्वारे स्पष्ट दिसून येतो.
यासंबंधी प्रचलित कथा सांगितल्याशिवाय या सणाचे महत्व काळात नाही, लक्षात येत नाही. त्यामुळे सण, उत्सवसंबंधी अनेक कथा सांगितल्या जातात.
नाग हा रक्षणकर्ता मानला जातो. आपल्याकडे अशी समजून आहे कि, मूळ पुरुष नागाच्या रूपाने वास्तूचे व धानाचे रक्षण करतो. आपल्या येथे नागांची देवालयेसुद्धा आहेत.
हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. नागांमुळे उंदीर शेताचे नुकसान करू शकत नाहीत म्हणून नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. हिंदू धर्मातील व्रतांमुळे व्रतांमुळे हिंदुस्थानची संस्कृती अखंड राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *