समंजस जोडीदार

By | May 20, 2020

आयुष्यात प्रत्येकाला समंजस जोडीदार लाभावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते🎙”. हे जर आपण गृहीत धरले तर ढोबळ मानाने त्या जोडीदारामध्ये हवी असलेली काही वैशिष्ट्ये:
१. समजूतदार,
२. स्वतः नेहमी आनंदी असणारा,
३. सर्वांशी प्रेमाने वागणारा,
४. तुम्हाला नेहमी खुश ठेवणारा,
५. तुमचा राग सहन करणारा,
६. तुमच्या मित्र परिवाराशी आपुलकीने वागणारा,
७. तुमच्या आवडी निवडी जोपासणारा,
८. तुमच्यावर अतोनात प्रेम करणारा
इत्यादी…
(टीप: वरील यादी अपूर्ण असण्याची पूर्ण शक्यता आहे आणि या यादीशी सर्वच सहमत असतील असे नाही.)

आता ही झाली समंजस जोडीदाराची वैशिष्ट्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर अतिशय हेवा वाटावा असं त्या जोडीदाराचं व्यक्तिमत्व असावं. पण हीच अपेक्षा प्रत्येकाची असल्यामुळे हाच नियम आपल्यालाही लागू पडायला हवा. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्तीही कदाचित हिच अपेक्षा करत असेल. मग आपण का नाही स्वतःचे व्यक्तिमत्त्व हेवा वाटेल असे बनवू शकत. “Nothing is Impossible”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *