सरळ रस्ता

एकदा एका अरब व्यापार्‍याने वाळवंटातून प्रवास करण्याकरिता आपल्या उंटावर बरेच सामान लादले. ते नीट घट्ट बांधून उंटाला जागेवरून उठवले. उंट मोठ्या कष्टाने उभा राहिला. व्यापार्‍याने उंटाचे तोंड गोंजारले आणि प्रेमाने विचारले:
”बोल मित्रा, आपण कोणत्या वाटेने जाऊया? टेकडीकडे चढण असलेल्या रस्त्याने की, टेकडीवरून उतार असलेल्या रस्त्याने?” उंट मालकाच्या कानाला लागून म्हणाला:

”मालक आपण न्याल त्या रस्त्याने मला यायलाच हवे. परंतु आपण प्रेमानेच विचारता आहात म्हणून सांगतो. आपण आपले सरळ मार्गानेच जाऊया. सरळ मार्ग लांबचा असतो. परंतु त्या मार्गावर धोके कमी असतात.”

उंटाचे बोलणे खरोखरच शहाणपणाचे होते. अरब व्यापार्‍याने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचे म्हणणे मान्य करून तो उंटासोबत चालू लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *