सर्व देवता वानर का बनले?

सर्व देवतांची पुकार ऐकून आकाशवाणी झाली की घाबरू नका. तुमच्यासाठी मी मनुष्याचे रूप धारण करीन. कश्यप आणि अदिती यांनी फार कठीण तप केले. मी आधीच त्यांना वर दिलेला आहे. तेच दशरथ आणि कौसल्येच्या रूपाने मनुष्यांचे राजा म्हणून प्रकट झाले आहेत. त्यांच्याच घरी जाऊन मी रामाचा अवतार घेणार आहे. तुम्ही सर्व निर्धास्त व्हा.

आकाशवाणी ऐकून देवता लगेच परत आले. ब्रम्हदेवाने पृथ्वीला समजावले. तेव्हा तिची भीती नाहीशी झाली. तुम्ही सर्व वानर रूप धारण करून पृथ्वीवर जा आणि भगवंताच्या चरणी सेवा करा असे सर्व देवतांना शिकवून ब्रम्हदेव आपल्या लोकात निघून गेले.

सर्व देवता आपापल्या लोकाला गेले. सर्वांच्या मनाला शांती मिळाली. ब्रम्हदेवाने जी काही आज्ञा दिली, त्यामुळे देवता खूप आनंदी झाले आणि त्यांनी उशीर केला नाही.

पृथ्वीवर त्यांनी वानराचे शरीर धारण केले. त्यांच्यात खूप बळ होते. ते सर्व भगवंतांच्या येण्याची वात पाहू लागले. ती जंगलात सगळीकडे आपापली सुंदर सेना तयार करून सर्वत्र पसरून राहिले.

अवध मध्ये रघुकुलशिरोमणी दशरथ नावाचा राजा झाला, ज्याचे नाव वेदांमध्ये विख्यात आहे. तो फार ज्ञानी होता. त्याच्या कौसल्यादी राण्या सर्व पवित्र आचरण करणाऱ्या आणि पतीला अनुकूल होत्या आणि श्रीहरी प्रती त्यांचे प्रेम फार दृढ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *