अगदी मरणाच्या पंथाला लागलेला एक हंस गाणे गात होता. ते ऐकून एक बगळा त्याला म्हणाला, ‘अरे मरणाच्या वेळी गाणे गात बसणारा तुझ्यासारखा दुसरा कोणी नसेल.’
तेव्हा हंसाने उत्तर दिले, ‘मित्रा, मला मरणाबद्दल मोठा आनंदच होतो आहे. कारण, मी आता अशा ठिकाणी जाणार आहे की जिथे धनुष्यबाण, बंदूक किंवा भूक यांचा त्रास मला होणार नाही. मग अशा आनंदाच्या प्रसंगी मी थोडं गायन केलं तर कुठे बिघडलं ?’
तात्पर्य
– जी गोष्ट अटळ आहे, त्याबद्दल दुःख करण्यात अर्थ नाही.
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply