हाक

नमस्कार मित्रानो, कालच माझे काका आजोबा गाव वरून आले . मी स्टोरी लिहत बसलो होतो . ते माझ्या रूम मध्ये आले आणि विचारलं कि काय करतोयस रे मी सांगितलं कि मी भूत प्रेतांच्या कथा लिहतो . लोकांनी सांगितलेले अनुभव लिहतो. ते हसले म्हणाले तू गोष्टी लिहतोस तेव्हा तुला भीती वाटते कारे , मी म्हणालो वाटते कधी कधी पण मजा येते वाचायला .

तेव्हा ते गंभीर झाले आणि म्हणाले तू जी मजा वाचून घेतोस न ती एखादा व्यक्ती जेव्हा अनुभवतो तेव्हा त् हालत होते ते तुला माहित नाही. त्यांच्या या बोलण्यावर मी सुधा गंभीर झालो पण कुतुहला पोटी मी त्यांना विचारले काय हो आजोबा तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का . ते पुन्हा हसले आणि म्हणाले मी मनुष्य गणाचा आहे आणि असे अनुभव येणे स्वाभाविक आहे. मग मला राहवले नाही मी त्यांना बोललो आजोबा तुमच्या सो घडलेली एखादी भयानक घटना असेल तर सांगा ना .

तेव्हा त्यांनी मला त्यांच्या सोबत घडलेला भयानक आणि अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला . आणि तो मी माझ्या शब्दात खालील प्रमाणे लिहिला . ते म्हणतात तेव्हा मी २५ वर्षांचा होतो . अंगाने पण असा भरलेला गडी आणि त्या वेळी मला भ नाद होता . अगदी रात्री अपरात्री जरी कुठे भजन असेल मी उठून जायचो . माझ्या कडे तेव्हा एक सायकल होती .

तिच्यानेच मी बाजूच्या वाडीत तर कधी दुसर्या गावात भजनाला जात असे . असेच एके दिवशी बाजूच्या गावाला भजनाची बारी होती. मी निघालो माझ्या सोबत जो येणार होता त्याला अचानक ताप आला म्हणून त्याने येणे टाळले . मी आपला एकटाच माझ्या सायकल वरून निघालो १० वाजले होते तिथे पोहचायला मला १ तास लागला भजन सुरु झाले . बारी एकदम भन्नाट रंगली सुमारे ३ तासाने भजनाचा कार्यक्रम आटोपला. सगळे निघाले माझ्या वाडीतून मी एकटाच होतो रात्रीचे २ वाजले होते .

मला तशी भीती नाही वाटायची कारण या आधी सुधा मी अनेक वेळा असा एकटा आलो होतो . मी निघालो गावच्या दिशेने १५ मिनिट झाले असतील . अचानक हवेत एक गारवा आला . आणि सायकल च्या वेगा मुळे तो अजूनच जाणवत होता . मी आपला भजन पुटपुटत जात होतो .

अचानक मला मागून कोणी तरी हाक मारली . मी दचकलो पण दुर्लक्ष केल मला वाटल भास झाला असेल . आणि परत आपल्या मार्गाला निघालो परत मागून मला हाक आली . या वेळी फार जवळून ऐकायला आली . मला माहित होत कि रात्रीच हाकेला साद द्यायची नसते मी जर जोरात सायकल चालवू लागलो .

तशी पुन्हा साद अल्ली ये हरी अरे थांब कि मागे तर बघ मी तसाच वेगाने निघालो . मागे पहिले नाही समोर गावाची सीमा होती आणि बाजूलाच वादाचे झाड होते , मी सीमा ओलांडली आणि मागे वळून पहिले आणि भीतीने कापायला लागलो . समोरच्या वादाच्या झाडावर एक माणसाने स्वताला फास लावून घेतला होता . . मी विचार केला कोण मेल आहे हा अचानक त्या लटक्त्या शरीराचे डोळे उघडले आणि मला कापरी भरली . तो फासावर लटकलेला माणूस मला पाहून हसत होता .

आणि अचानक बोलला वाचलास आणि अदृश्य झाला . मी घरी आलो मला ताप भरला होता . तेव्हा पासून मी परत एकता कधीच गेलो नाही आणि तुला पण सांगतो कधीच रात्रीच्या हाकेला ओ देऊ नकोस .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *