हेच आहे का या प्रेमाचे संकेत

प्रेम काय असतं आणि प्रेमात कसे पडतात हे मला माहीत नव्हते, प्रेम हा मुळात माझ्या जीवनाचा विषयच नव्हता म्हणून मला त्यात पास होण्याची भीती नव्हती. पण एक दिवस मी तिला पाहिले. तिच्या विषयी वेगळी भावना मनात निर्माण झाली. ती भावना कसली होती हे मला माहित नव्हते. तिचे अबोल हसणे मला सारखे बघावेसे वाटायचे. ती दिसली नाही तर मन कासावीस व्हायचं. ती समोर येण्याच्या आधी वेगळाच सुगंध आजूबाजूस दरवळायचा कदाचित तिच्या येण्याचा संकेत असावा.

उगीच तिची वाट पाहत बसणे मनाला आवडायचे. ज्या दिवशी ती नाही यायची तेव्हा मन तिलाच शोधायचे. वेगळीच भीती मनात वाटायची आणि ती समोर आली की मन फुलून यायचं. असे वाटायचे की तिच्या प्रत्येक सुख दु:खात भागीदार व्हावे. तिच्या प्रत्येक हसण्याचे कारण मी बनावे.

एक इच्छा झाली तिला जवळून पाहण्याची. तिचे निरागस डोळे, आणि तिचे कोमल हसू पाहण्यास मन आतुर व्हायचे. तुझ्या सोबत आयुष्य काढायचं आहे. तुला एकदा मिठीत घ्यायचं आहे. तुझ्या सोबत एक स्वप्न रंगवले आहे मी, एक छोटसं घरटे असावे त्यात तू आणि मी बाकी कोणी नको. मला सांगशील का हेच आहे का या प्रेमाचे संकेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *