CATEGORY

बालसंस्कार

शिक्षणाचे अर्थशास्त्र (Economics of Education)

शिक्षण प्रक्रियेमध्ये आर्थिक तत्त्वे, संकल्पना, नियम, सिद्धांत, वित्तपुरवठा, विविध शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी शिक्षणासंबंधी आर्थिक मुद्द्यांचा अभ्यास आणि उपयोजन करणे म्हणजे शिक्षणाचे अर्थशास्त्र होय. यामध्ये दुर्मिळ साधनांचे वाटप विशिष्ट पूर्वनिश्चित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कसे करावे, याच्याशी निगडीत असणारे सर्व प्रश्न अभ्यासले जातात. शिक्षणात वापरता येणाऱ्या वस्तूंची निर्मिती, पुरवठा आणि तत्सम बाबींचे आर्थिक व्यवस्थापन केले जाते. तसेच शालेय शिक्षणासंदर्भातील मानवी वर्तन क्रिया […]

READ MORE

शैक्षणिक नैदानिक चाचणी (Educational Diagnostic test)

र्वसामान्यपणे शिक्षकाने एखाद्या घटकाचे अध्यापन केल्यानंतर अध्यापन करण्यापूर्वी ठरविलेले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, हे पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लेखी वा तोंडी स्वरूपात केलेले मूल्यमापन म्हणजे नैदानिक चाचणी होय. सदर चाचणीचा उपयोग शिक्षकाच्या अध्यापनानंतर वर्गातील विद्यार्थी अपेक्षित पातळी गाठतात की नाही? संबंधित विद्यार्थ्याने वा विद्यार्थिगटाने अपेक्षित पातळी का गाठली नाही? तो कोठे कमी पडला? का कमी […]

READ MORE

शैक्षणिक मार्गदर्शन (Educational Guidance)

विद्यार्थ्यांमधील अभिरुची, अभिवृत्ती, क्षमता इत्यादी लक्षात घेऊन त्यांना शालेय जीवनाशी समायोजन साधण्यास प्रवृत्त व सहकार्य करणे म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय. शैक्षणिक जीवनातील विविध क्षेत्रांशी समायोजन साधण्यासाठी, त्या त्या क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय. मार्गदर्शन ही मानसशास्त्राने शिक्षणशास्त्राला दिलेली देणगी आहे. कॉफर्ड यांच्या मते, ‘विद्यार्थ्यांना […]

READ MORE

शैक्षणिक समुपदेशन (Educational Counselling)

प्रौढ विद्यार्थी – विद्यार्थिनींना स्वत:च्या बऱ्यावाईट कृती समजून घेण्यास आणि परिणामक रीत्या सुखी जीवन व्यतीत करण्यास साह्यभूत ठरणारी एक संकल्पना. समुपदेशन या संज्ञेत मार्गदर्शन आणि समुपदेशन या दोन समानार्थी संज्ञा अध्याहृत असून त्या प्रसंगानुसार वापरल्या जातात. मार्गदर्शन या संज्ञेत सल्ला हा महत्त्वाचा असतो, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. समुपदेशन हे निर्णयप्रक्रियेत परिस्थित्यनुसार कोणती गोष्ट योग्य-अयोग्य याचे […]

READ MORE

शैक्षणिक संशोधन (Educational Research)

ज्ञानविज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणे शिक्षणशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. बदलती सामाजिक परिस्थिती व ज्ञानाच्या रूंदावणाऱ्या कक्षा यांमुळे शिक्षणक्षेत्राच्या सर्व पैलूंवर आणि पातळ्यांवर झपाट्याने बदल घडून येत आहेत. या बदलांबरोबरच उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांशी संबंधित मूलभूत तत्त्वे, नियम इत्यादींचा शोध घेण्याचे काम शिक्षणशास्त्राच्या ‘शैक्षणिक संशोधन’ या शाखेत चालते. मानवी जीवन सुसंस्कृत करण्याकरिता शैक्षणिक संशोधन हा महत्त्वाचा भाग […]

READ MORE

प्रात:स्मरण

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। १ ।।शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। २ ।।कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ३ ।।या कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।या ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।सा मां पातु सरस्वती […]

READ MORE