Category Archives: Education

अभ्यासक्रम विकसन (Curriculum Development)

अध्ययनार्थ्यांची अभिरुची, क्षमता आणि गरज यांच्या आधारे विचार करून अध्ययनअनुभव निवडणे, त्यांची रचनात्मक कार्यवाही करणे इत्यादी फलितांचे मूल्यमापन करण्यासाठी समाविष्ट असणारी सुसूत्र रचनात्मक प्रक्रिया म्हणजे अभ्यासक्रम  विकसन होय. गरजेचे विश्लेषण, उद्दिष्ट आराखडा (Design), योग्य अध्ययन-अध्यापनपद्धती, संशोधन आणि योग्य मूल्यमापनपद्धती हे विविध दृष्टिकोन पुढे ठेवून अभ्यासक्रम विकसन करण्यात येते. अभ्यासक्रम विकसनामध्ये अभ्यासक्रम मूल्यमापन समिती आणि अभ्यासक्रम… Read More »

कोठारी आयोग (Kothari Commission)

भारतातील सहावा शैक्षणिक आयोग. यालाच भारतीय शिक्षण आयोग (Indian Education Commission) असेही म्हणतात. याची स्थापना १४ जून १९६४ मध्ये प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ व भारताचे तत्कालीन संरक्षण सल्लागार डॉ. डी. एच. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. भारत शासनाचे तत्कालीन शैक्षणिक सल्लागार जे. पी. नाईक हे या आयोगाचे चिटणीस होते. यापूर्वीच्या आयोगांनी शिक्षणाच्या एका विशिष्ट स्तराचाच विचार केला… Read More »

अभ्यासक्रम (Curriculum)

शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेजे संस्कारकारी अनुभव योजले जातात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. अभ्यासक्रमास अभ्यासयोजना असेही म्हणतात. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या अनुभवांचे विविध स्वरूप असते. अभ्यासक्रम साधन होय, साध्य नव्हे; म्हणून तो उद्दिष्टांच्या अंकित असतो. उदा., ‘प्रत्येक व्यक्तीच्या अंगी स्वतःचे विचार प्रकट करण्याचे व दुसऱ्यांचे विचार समजून… Read More »

पर्यावरण शिक्षण (Environment Education)

विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभोवती असलेल्या मानवनिर्मित व जैविक घटकांचे सरंक्षण आणि पालन-पोषण करण्याचे ज्ञान देवून त्यांच्यात पर्यावरणाबाबत सकारात्मक कौशल्य निर्माण करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. भूतलावर मानव हा सर्वांत बुद्धीवान  प्राणी आहे. मानवाने स्वत:चे जीवन सुखी बनविण्यासाठी विज्ञान व तंत्रविज्ञानाचा वापर करून सुखसोयी प्राप्त केल्या आहेत. परिणामत: विकसीत व विकसनशील देशात प्रकल्पाची उभारणी करून अनेक जीवघेण्या… Read More »

बालकेंद्रित शिक्षण (Child Centered Education)

शिक्षण ही संकल्पना १९६०च्या दशकानंतर आकलनशास्त्राचा (Cognitive Science) उदय झाल्यानंतर प्रचारात आली. या संकल्पनेने शिक्षणविषयक विचारांत आणि व्यवहारांत मूलभूत परिवर्तन घडवून आणले आहे. शिक्षणाचा सामाजिक, राजकिय, व्यावहारिक, तात्विक इत्यादी विचार मुलांच्या दृष्टिकोनातून होणे, म्हणजे बालकेंद्रित शिक्षण होय. या शिक्षणात प्रथमत: मुलांच्या भावनांना व नंतर शिक्षण विषयांना स्थान दिला जातो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून शिक्षणाच्या आचार-विचारांत वर्तनवादी… Read More »

जीवन कौशल्ये (Life Skills)

आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. ह्या बदलांमुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वत:ला समजून घेण्याची क्षमता विकसित होण्यास त्यास अडसर निर्माण होत आहे. व्यक्तिचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे अंतीम उद्दिष्ट मानले जाते. त्या सर्वांगिण विकासामध्ये मानसिक क्षमतांचा जास्तीत… Read More »

ज्ञानरचनावाद (Constructivism)

पूर्वज्ञान व पूर्वानुभव यांच्या आधारे नवीन ज्ञानाची किंवा संकल्पनेची रचना-निर्मिती करणे, म्हणजे ज्ञानरचनावाद होय. ज्ञानरचनावाद ही शिक्षणशास्त्रातील नव-संकल्पना असून ती एक अध्ययनाचे तत्त्वज्ञान आहे. ज्यामध्ये ज्ञानाची रचना ही आपल्या अनुभवाच्या परावर्तनामध्ये होते. यानुसार विद्यार्थी स्वत:चे ज्ञान स्वत: संरचित करतात. ज्ञानरचनावाद हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ २००५) याचा पाया असून बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम… Read More »

विशेष शिक्षण (Special Education)

विशेष गरजा असणाऱ्या मुलांचा विचार करून विविध तंत्र-साधने, सुविधा व उपकरणे यांच्या साह्याने जी शिक्षण प्रणाली आणि अध्यापनपद्धती ठरविली जाते, त्यास ‘विशेष शिक्षण’ म्हणतात. जेव्हा शिक्षक सर्व साधारण विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून शिकवतो, तेव्हा त्याचे शिकविणे विशेष मुलांना उपयोगी पडतेच असे नाही. त्यामुळे सर्व साधारण विद्यार्थ्यांपेक्षा वेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीनुसार विशेष शिक्षण मिळावे याकरिता शासनाकडून सोय… Read More »

रूब्रिक्स (Rubrics)

शैक्षणिक दृष्ट्या मूल्यांकनाचे एक साधन. याला गुणांकन मार्गदर्शिकासुद्धा म्हणता येईल; कारण मूल्य अंकित करणे हे या श्रेणीचे मुख्य कार्य आहे. ज्ञान, संकल्पना, कौशल्य, गुण इत्यादीसंबंधी संपादन किंवा दर्चाचे मोल ठरविण्यासाठी/तपासण्यासाठी रूब्रिक्स मूल्यमापन श्रेणीचा उपयोग केला जातो. प्रत्येक कृती किंवा विहित कार्य यातील अपेक्षित गोष्टी अधोरेखांकित करण्यासाठीसुद्धा याचा वापर होऊ शकतो. रुब्रिक्स मूल्यमापन श्रेणी सामान्यत: विद्यार्थ्यांच्या विविध… Read More »

वंचितांचे शिक्षण (Teaching of Deprived Children’s)

समाजविकासप्रक्रियेत ज्या अनेक सामाजिक घटकांना शिक्षणाची संधी मिळत नाही, अशा सर्व वंचि घटकांचा यात समावेश होतो. या वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था, म्हणजे वंचितांचे शिक्षण होय. देशात शिक्षणाचा अधिकार आणि हक्क अमलात आला असूनही कायद्यानुसार देशातील एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, याची जबाबदारी देशाच्या व राज्याच्या शिक्षणखात्यावर असतानासुद्धा वंचित घटकांना शिक्षणाची सुविधा… Read More »