CATEGORY

Education

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Policy On Education)

भारतीय नागरिकांमध्ये शिक्षणाचा पुरस्कार करण्यासाठी भारत सरकारने आखलेले धोरण. ग्रामीण व नागरी भारतातील प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण कसे असावे, याची आखणी सदर धोरण करते. १९६८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी प्रथमत: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविले. तेव्हापासून त्यात वेळोवेळी आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. १९४७ नंतर स्वतंत्र भारतातील नागरिकांच्या निरक्षरतेची समस्या दूर […]

READ MORE

वुडचा अहवाल (Wood’s Report)

भारतातील शिक्षणासंबंधीचा एक अहवाल. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी भारतात राज्य स्थापन केले. त्या वेळी भारतातील लोकांना पाश्चात्त्य ज्ञान द्यावे की, पौर्वात्य, शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे की, इंग्रजी भाषा, अशा प्रकारचे वाद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर भारतातील शिक्षणाचे सर्वसमावेशक सर्वेक्षण करावे, असा विचार पुढे आला. वुडच्या अहवालाने हे काम केले. १८५३ मध्ये ‘हाउस ऑफ कॉमन्स’ची […]

READ MORE

शिक्षण (Education)

शिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गुरू होते. पुढे हळूहळू जीवनव्यवहाराच्या कक्षा बदलल्याने आईवडीलांना चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामत: मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना वेळ मिळेनासा झाला. पुढे उपजीविकेपुरते शिक्षण हा विचार बदलून लिहिणे, वाचणे व अंकज्ञान असे स्वरूप शिक्षणाला प्राप्त झाले. हे नवे स्वरूपही […]

READ MORE

शिक्षणाचे अर्थशास्त्र (Economics of Education)

शिक्षण प्रक्रियेमध्ये आर्थिक तत्त्वे, संकल्पना, नियम, सिद्धांत, वित्तपुरवठा, विविध शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी शिक्षणासंबंधी आर्थिक मुद्द्यांचा अभ्यास आणि उपयोजन करणे म्हणजे शिक्षणाचे अर्थशास्त्र होय. यामध्ये दुर्मिळ साधनांचे वाटप विशिष्ट पूर्वनिश्चित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कसे करावे, याच्याशी निगडीत असणारे सर्व प्रश्न अभ्यासले जातात. शिक्षणात वापरता येणाऱ्या वस्तूंची निर्मिती, पुरवठा आणि तत्सम बाबींचे आर्थिक व्यवस्थापन केले जाते. तसेच शालेय शिक्षणासंदर्भातील मानवी वर्तन क्रिया […]

READ MORE

शैक्षणिक नैदानिक चाचणी (Educational Diagnostic test)

र्वसामान्यपणे शिक्षकाने एखाद्या घटकाचे अध्यापन केल्यानंतर अध्यापन करण्यापूर्वी ठरविलेले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, हे पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लेखी वा तोंडी स्वरूपात केलेले मूल्यमापन म्हणजे नैदानिक चाचणी होय. सदर चाचणीचा उपयोग शिक्षकाच्या अध्यापनानंतर वर्गातील विद्यार्थी अपेक्षित पातळी गाठतात की नाही? संबंधित विद्यार्थ्याने वा विद्यार्थिगटाने अपेक्षित पातळी का गाठली नाही? तो कोठे कमी पडला? का कमी […]

READ MORE

शैक्षणिक मार्गदर्शन (Educational Guidance)

विद्यार्थ्यांमधील अभिरुची, अभिवृत्ती, क्षमता इत्यादी लक्षात घेऊन त्यांना शालेय जीवनाशी समायोजन साधण्यास प्रवृत्त व सहकार्य करणे म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय. शैक्षणिक जीवनातील विविध क्षेत्रांशी समायोजन साधण्यासाठी, त्या त्या क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय. मार्गदर्शन ही मानसशास्त्राने शिक्षणशास्त्राला दिलेली देणगी आहे. कॉफर्ड यांच्या मते, ‘विद्यार्थ्यांना […]

READ MORE

शैक्षणिक समुपदेशन (Educational Counselling)

प्रौढ विद्यार्थी – विद्यार्थिनींना स्वत:च्या बऱ्यावाईट कृती समजून घेण्यास आणि परिणामक रीत्या सुखी जीवन व्यतीत करण्यास साह्यभूत ठरणारी एक संकल्पना. समुपदेशन या संज्ञेत मार्गदर्शन आणि समुपदेशन या दोन समानार्थी संज्ञा अध्याहृत असून त्या प्रसंगानुसार वापरल्या जातात. मार्गदर्शन या संज्ञेत सल्ला हा महत्त्वाचा असतो, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. समुपदेशन हे निर्णयप्रक्रियेत परिस्थित्यनुसार कोणती गोष्ट योग्य-अयोग्य याचे […]

READ MORE

शैक्षणिक संशोधन (Educational Research)

ज्ञानविज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणे शिक्षणशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. बदलती सामाजिक परिस्थिती व ज्ञानाच्या रूंदावणाऱ्या कक्षा यांमुळे शिक्षणक्षेत्राच्या सर्व पैलूंवर आणि पातळ्यांवर झपाट्याने बदल घडून येत आहेत. या बदलांबरोबरच उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांशी संबंधित मूलभूत तत्त्वे, नियम इत्यादींचा शोध घेण्याचे काम शिक्षणशास्त्राच्या ‘शैक्षणिक संशोधन’ या शाखेत चालते. मानवी जीवन सुसंस्कृत करण्याकरिता शैक्षणिक संशोधन हा महत्त्वाचा भाग […]

READ MORE

समावेशक शिक्षण (Inclusive Education)

भिन्न क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते, त्यास समावेशक शिक्षण म्हणतात. हे शिक्षण ‘समान संधी’ तत्त्वावर आधारलेले असून या शिक्षणपद्धतीच्या मुख्य प्रवाहात सर्वांचा स्वीकार केला जातो. इतिहास : १९६० मध्ये ‘सर्वांसाठी शिक्षणʼ (Education for all) ही संकल्पना जगातील अनेक देशांत अस्तित्वात आली होती. या संकल्पनेस […]

READ MORE

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (Continuous Universal Evaluation)

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळा-महाविद्यालयस्तरांवरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. यामध्ये शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सतत केले जाते. आजच्या वैज्ञानिक युगाची प्रगती मापनावर आधारित आहे. मापनासंदर्भात ज्येष्ठ विचारवंत रॉस म्हणतात की, ‘जर मापनाची सर्व तंत्र-साधने या जगातून नाहीशी झाली, तर या आधुनिक जगाची सर्व सभ्यता वाळूच्या […]

READ MORE