दंडकारण्य उत्पत्ती कथा
महर्षी अगस्तीचे वास्तव्य दंडकारण्यातील एका आश्रमात होते. तेथे एकदा श्रीराम त्यांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी विचारले, “हे एवढे मोठे वन पशुपक्षीविरहित निर्जन, शून्य व भयंकर कसे बनले?” या प्रश्नाचे उत्तर देताना अगस्तींनी दंडकारण्याची उत्पत्ती कथा सांगितली ती अशी- सत्ययुगात इक्ष्वाकू नावाचा धर्मपरायण राजा होता. त्याने अनेक यज्ञ केले. त्याच्या अनेक पुत्रांपैकी सर्वांत धाकटा हा शूर,… Read More »