सुस्वागतम......

शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त Website वर सहर्ष स्वागत...

बालोद्यान पद्धति

सामान्यपणे ३ ते ५ वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेली शाळा. मराठीत बालकमंदिर ही संज्ञाही रूढ आहे. फ्रीड्रिख फ्रबेल (१७८२–१८५२) हा जर्मन शिक्षणतज्ञ बालोद्यानाचा आद्य प्रवर्तक होय. त्याने फ्रँकफ्रुर्ट, इव्हरडन इ. ठिकाणी अनुक्रमे १८०५, १८०७ मध्ये पेस्टालोत्सीच्या तत्त्वानुसार शाळा चालविल्या. पुढे १८३७ साली ब्लांकेनबर्ग येथे त्याने पहिल्या बालोद्यानाची स्थापना केली. इव्हरडन येथे त्याला योहान हाइन्ऱिक पेस्टालोत्सी या शिक्षणतज्ञाचे सान्निध्य व मार्गदर्शन लाभले आणि त्याचे शिक्षणविषयक विचार परिणत झाले. शिक्षणपद्धतीची सारभूत अशी पुढील तीन सूत्रे त्याने निश्चित केली : (१) बालक हा शिक्षणाचे केंद्र असावा. (२) अध्यापकांची मुलांशी वागणूक प्रेमळपणाची असावी. (३) अध्ययनात पुस्तकी विद्येपेक्षा गाणी, खेळ, उत्स्फूर्त कामे यांस प्राधान्य द्यावे. या तत्वांनुसार फ्रबेलने शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले. स्वित्झर्लंड येथील शिक्षक प्रशिक्षण कार्यात त्याला प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व पटले. सत्प्रवृत्त व सहकारी समाज निर्माण करण्याचे ध्येय अनुरूप शिक्षणाने साध्य होऊ शकेल, हे जाणून शिशुशिक्षणाची आदर्श पद्धती शोधून काढण्याच्या मार्गास तो लागला. या मार्गातील पहिले पाऊल म्हणजे १८३७ मध्ये ब्लांकेनबर्ग येथे स्थापलेले बालोद्यान होय.

माँटेसरी शिक्षण पद्धति

शालेयपूर्व वयातील मुलांच्या शिक्षणाची पद्धती. मारिया माँटेसरी (१८७०–१९५२) हिने वरील शिक्षण पद्धतीचा पाया घातल्याने तिचेच नाव या शिक्षण पद्धतीस देण्यात आले. माँटेसरीने अविश्रांत परिश्रम करून इटली मधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धत शोधून काढली. घरामधील विस्कळीत व शिक्षणास प्रतिकूल वातावरण बघून माँटेसरीचे असे मत झाले, की मुलांना यशस्वी शिक्षण देण्यास सुनियंत्रित व शिस्तबद्ध वातावरणाची गरज भासते. अशा प्रकारचे वातावरण शाळा निर्माण करू शकतात. त्यासाठी माँटेसरीने संवेदनक्षमता विकसित करणारे साहित्य तयार केले आणि अध्ययन–अध्यापनाची नवीन उपपत्ती मांडली. आज जगभर ही एक यशस्वी पद्धत म्हणून ओळखली जाते.

आनंददायी शिक्षण

आनंददायी शिक्षणाचं महत्त्व आहे. केवळ शिक्षणातच नाही. माणसाला प्रत्येककृतीतच आनंद हवा असतो. दिवसभर कामाच्या, कधी नको त्या माणसांच्या रगाडय़ात, कधी रागावलेला- कातावलेला असतो तेव्हा त्याला आनंद हवा असतो. लहान मुलं तरसदैव आनंदात असतात. स्वत:ला रमवत असतात, स्वत:शी हसत असतात, गाणीगुणगुणतात. मोकळेपणाने नाचतात. स्वत:ला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात असतात.कोणी रागावलं, मारलं तर मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. त्या निर्माणहोतच असतात. मात्र त्या दीर्घकाळ रेंगाळू नयेत.अखेर आपला मेंदू म्हणजेअनेक तऱ्हेचं वायिरग आहे. नकारात्मक भावनांशी जास्त वायिरग जुळलं, म्हणजेमेंदूच्या त्या भागात जास्त न्यूरॉन जुळले तर त्याचा परिणाम झाल्याशिवायराहणारच नाही.त्यापेक्षा न्यूरॉन आनंदाशी जुळावेत

Latest News

Professional team that aims to respect your child’s feelings, to give them responsibility,
independence and freedom to make choices.